Aadhar Card : आधार कार्ड हे जवळपास सर्वच सरकारी तसेच महत्वाच्या खाजगी व्यवहारांसाठी आता आवश्यक झाले आहे. कोणतीही सरकारी योजना असो त्यासाठी आपल्याला आधार कार्डची गरज भासते.

अनेक सेवांसाठी ते आपल्याला आवश्यक आहे. बँकेत खाते उघडण्यापासून ते आपले डीमॅट खाते बनवण्यापर्यंत आपल्याजवळ आधार कार्ड असणे आवश्यक आहे. आज आपण त्यासंबंधित महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत.

वास्तविक भारतातील नागरिकांसाठी आधार कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. देशातील नागरिकांचे ओळखपत्र आणि पत्त्यासाठी हे खूप महत्वाचे आहे.

हा 12 अंकी वैयक्तिक क्रमांक आहे, जो भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) जारी केला आहे. या आधार कार्डमध्ये व्यक्तीचे नाव, तिची जन्मतारीख, बायोमेट्रिक डेटा, छायाचित्र, पत्ता इत्यादी सर्व माहिती असते. आता तुम्ही तुमचे ई-आधार कार्ड ऑनलाइन कुठूनही डाउनलोड करू शकता,

कुठूनही ई-आधार डाउनलोड करा :- हे आधार कार्ड आयुष्यभर वैध आहे. देशातील नागरिकांना बँकिंग, मोबाईल फोन कनेक्शन आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे.

UIDAI ने सांगितले की तुम्ही आता तुमचा ई-आधार कुठूनही, कधीही डाउनलोड करू शकता. तुम्ही ते mAadhaar अॅपवरूनही डाउनलोड करू शकता.

अशा प्रकारे ई-आधार डाउनलोड करता येईल.
UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
‘आधार डाउनलोड करा पर्याय निवडा किंवा https://eaadhaar.uidai.gov.in/ या लिंकला भेट द्या.
यांनतर उपलब्ध विभागातून ‘आधार’ पर्याय निवडा.
12 अंकी आधार क्रमांक टाका. आधार क्रमांक टाकताना योग्य ती काळजी घ्या.
नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP मिळविण्यासाठी कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि ओटीपी पाठवा वर क्लिक करा आणि नंतर ओटीपी प्रविष्ट करा.
ई-आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी ‘Verify and Download’ वर क्लिक करा.