Post office Scheme : स्वप्नपूर्ती करणारी पोस्ट ऑफिसची ही योजना! गुंतवणूक करा अन् जबरदस्त रिटर्न्स मिळवा

Post office Scheme : आजघडीला सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणून पोस्ट बँकेकडे पाहिले जाते. पोस्ट ऑफीसदेखील आपल्याला भरपूर योजना देऊ करते, ज्यामध्ये सुरक्षिततेसोबत मजबूत फायदादेखील दिला जातो. आज आपण पोस्ट ऑफिसच्या एका महत्वाच्या योजनेबद्दलजाणून घेणार आहोत.

वास्तविक पोस्ट ऑफिसमध्ये छोट्या बचतीसाठी अनेक योजना आहेत. ज्यामध्ये FD करण्याची सुविधा देखील समाविष्ट आहे. बँकेप्रमाणे तुम्ही पोस्ट ऑफिसमध्येही एफडी करू शकता. ही योजना टाईम डिपॉझिटच्या नावाने पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये तुम्ही 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे आणि 5 वर्षांसाठी पैसे जमा करू शकता. फायदा असा आहे की येथे एफडीवरील व्याजदर बँकेपेक्षा जास्त आहे. पोस्ट ऑफिसच्या 2 वर्षांच्या मुदत ठेवीमध्ये 20 बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आली आहे. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट अंतर्गत, 5 वर्षांच्या ठेवींवर 6.7 टक्के वार्षिक व्याज दिले जाते.

या पोस्ट ऑफिस योजने अंतर्गत तुम्ही एक, दोन, तीन किंवा पाच वर्षांसाठी पैसे जमा करू शकता. एका वर्षाच्या गुंतवणुकीवर ५.५% परतावा, दोन वर्षांच्या गुंतवणुकीवर ५.७ टक्के परतावा, ३ वर्षांच्या गुंतवणुकीवर ५.८ टक्के परतावा आणि पाच वर्षांच्या गुंतवणुकीवर ६.७ टक्के परतावा. या योजनेतील व्याज वार्षिक आधारावर दिले जाते. तथापि, व्याजाची गणना तिमाही आधारावर केली जाते. अशा परिस्थितीत कार-बंगला खरेदी करण्यासाठी त्याच आधारावर गुंतवणूक करता येते. यातून चांगला परतावा मिळू शकतो. वाढलेले. व्याजदर १ ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत.

टाईम डिपॉझिट खाते पोस्ट ऑफिसमध्ये कमीत कमी रु 1000 मध्ये उघडता येते.

क्रेडिट कार्डवर ३ लाखांचा जीवन विमा मोफत

योजनेची वैशिष्ट्ये

कोणीही एकच खाते उघडू शकतो.

3 प्रौढ एकत्र खाते उघडू शकतात.

10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलाच्या नावावर पालक खाते उघडू शकतो.

जमा केलेल्या कमाल रकमेवर मर्यादा नाही.

या योजनेद्वारे, आयकर कायदा 1961 च्या कलम 80C अंतर्गत 5 वर्षांच्या गुंतवणुकीवर कर सूट मिळू शकते.