Health Tips : चहा बनवताना तुम्ही ‘या’ चुका करतात का ? तर सावधान नाहीतर ..

Health Tips : आज आपल्या देशात चहा किती लोकप्रिय आहे हे सांगण्याची गरज नाही आहे . आज आपल्या आजूबाजूला अशी अनेक माणसे आहे ज्यांना सकाळी सकाळी चहा लागतो.

तर काहीजण दिवसभरात अनेक कप चहा पितात. चहामध्ये स्वादासाठी आले, वेलची, काळी मिरी इत्यादी पदार्थ टाकले जातात मात्र तुम्हाला हे माहिती आहे का नेक आरोग्य तज्ञ आणि डॉक्टर सल्ला देतात कि दूध आणि साखरेच्या चहाचे जास्त सेवन आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक ठरू शकते. यातच तुम्ही चहा बनवत असताना सतत काही चुका करत असाल तर ते तुमच्यासाठी अधिक घातक ठरू शकते.

आज या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला चहा बनवण्यासाठी कोणकोणत्या पद्धतींचा वापर करू नये ज्या तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतात हे सांगणार आहोत. चला मग जाणून घेऊया याबद्दल संपूर्ण माहिती.

चहा बनवताना या चुका करू नका

आपण पाहिलं आहे की अनेक लोक चहा हा एक छंद म्हणून स्वतःसाठी बनवतात आणि या दरम्यान ते अशा काही चुका करतात ज्यामुळे आपला चहा शरीरासाठी हानिकारक ठरतो.

अनेकदा आपल्याला असे आढळून आले आहे की चहा बनवण्याच्या पद्धतीमध्ये बरेच लोक आधी दूध उकळतात आणि नंतर त्यात पाणी, साखर आणि चहापत्ती टाकतात. जे पूर्णपणे चुकीचे आहे.

तर दुसरीकडे असे बरेच लोक आहेत जे चहाचे शौकीन आहेत आणि त्यांना कडक चहा पिण्याची सवय आहे. म्हणून ते चहा गरजेपेक्षा जास्त गॅसवर ठेवतात. जे आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक आहे.

त्याचबरोबर चहामध्ये जास्त साखर घालण्याची सवय असणारे अनेक लोक आहेत. ही प्रक्रिया सुरू ठेवल्याने तुमच्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढेल. भविष्यात तुम्हाला मधुमेह आणि साखरेसारख्या आजारांना सामोरे जावे लागू शकते.

चहा बनवण्याची योग्य पद्धत

ब्रिटीश स्टँडर्ड्स इन्स्टिट्यूशननुसार असे कळले आहे की चहा बनवण्यासाठी सर्वात आधी दोन भांडी घ्यावी लागतात. नंतर एकात पाणी आणि दुस-यामध्ये दूध टाकून गॅसवर ठेवा. ज्या भांड्यात पाणी ठेवले आहे त्यात चहापत्ती, साखर आणि चहाशी संबंधित मसाले टाकायचे असतील तर ते टाकून उकळवा. तसेच दूध उकळत असताना मधेच चमच्याने ढवळत राहा.

दोन्ही भांड्या एकाच वेळी उकळू लागल्यावर पाण्याच्या भांड्यात दूध मिसळावे लागते. यानंतर दोन्ही काही वेळ एकत्र उकळवावे नंतर ते आपल्या कपमध्ये गाळून घ्या.

आपल्याला या प्रक्रियेद्वारे चहा बनवण्यास सांगितले जाते कारण दूध आणि पाणी एकत्र जास्त वेळ उकळल्याने आपल्या पोटात समस्या किंवा त्रास होऊ शकतो. तुम्हीही चहाचे शौकीन असाल तर या प्रक्रियेतूनच चहा बनवा जो तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.

हे पण वाचा :  Success Story: भारीच .. ‘या’ शेतकऱ्याने स्ट्रॉबेरी आणि पपईच्या शेतीमधून केली 10 लाखांहून अधिक कमाई