Mutual fund : 5 वर्षांत कमवा 5 लाख! फक्त अवलंबवा गुंतवणुकीची ही रणनीती

Mutual fund : अशातच आज आपण गुंतवणूकीच्या महत्वाच्या पर्यायाबाबत जाणून घेणार आहोत. तुम्ही यात गुंतवणूक करून लक्षाधीश होण्याचा टप्पा गाठू शकता.

वास्तविक मध्यमवर्गीय नोकरदार व्यक्तीसाठी मोठी बचत करणे ही मोठी गोष्ट आहे त्यासाठी त्यांना दरमहा काही रक्कम वाचवावी लागते. काही लोकासाठी, लाखांची बचत करणे खूप सोपे आहे. तर काहींसाठी ही बचत साध्य करण्यासाठी वर्षे लागतात. तुम्हालाही फक्त पाच वर्षांत पाच लाख रुपये जमा करायचे असतील तर आज आम्ही तुमच्यासाठी पद्धतशीर SIP योजना घेऊन आलो आहोत. ज्याद्वारे तुम्ही तुमचा इच्छित परतावा सहज मिळवू शकता.

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे SIP म्हणजे काय?

एसआयपी म्हणजे म्युच्युअल फंडामध्ये ठराविक कालावधीत गुंतवणूक करणे याद्वारे तुम्ही साप्ताहिक, मासिक किंवा त्रैमासिक अंतराने गुतवणूक करू शकता. ठराविक कालावधीत ठराविक रक्कम गुंतवणे चांगली गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्ही फक्त 500 रुपयापासून सुरुवात करू शकता. बाजारात अशा अनेक योजना आहेत, ज्या SIP द्वारे गुतवणुकीवर वेगवेगळे व्याज देतात. म्हणूनच कोणत्याही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. कारण त्यात धोकाही दडलेला आहे.

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये किती गुंतवणूक करावी याकडे मध्यमवर्गीय लोकांच्या गुतवणुकीची पहिली पसंती म्हणून पाहिले जाते. जर तुम्ही दर महिन्याला फक्त 6500 रुपये SIP मध्ये गुंतवले तर पाच वर्षात पाच लाख रुपये जमा होतील. ही योजना तुम्हाला मासिक अंतराने गुतवणूक करण्याचा आग्रह धरते.दरमहा 6500 रुपये गुंतवल्यास तुमची वार्षिक गुंतवणूक 78 हजार होईल. जे तुम्हाला पाच वर्षे चालू ठेवावे लागेल म्हणजे पाच वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक 3 लाख 90 हजार होईल यामध्ये तुम्हाला 12 टक्के व्याज मिळत असेल तर तुम्हाला 2.5 लाखापर्यंतचा परतावा मिळेल. म्हणजेच पाच वर्षानंतर तुमची एकूण रक्कम पाच लाखांपेक्षा जास्त होईल.

याद्वारे तुम्ही जितकी जास्त रक्कम गुंतवाल तितका जास्त परतावा मिळेल म्हणूनच गुतवणूक सुरू करण्यापूर्वी तुमचे आर्थिक ध्येय निश्चित करा आणि मग ते साध्य करण्याचा प्रयत्न करा.