Yamaha Electric Scooter: लाँग रेंजसह यामाहा लॉन्च करणार नवीन इलेक्ट्रिक स्कूटर! जाणून घ्या त्याची खासियत
Yamaha Electric Scooter: देशात आता इलेक्ट्रिक स्कूटरची मागणीमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. त्यामुळेच सध्या मार्केटमध्ये दररोज ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच होता आहे.
यातच आता यामाहाही आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहेत. आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर यामाहा 2023 मध्ये लॉन्च करणार असल्याची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. यामाहा निओ नावाची इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करू शकते. जाणून घ्या संपूर्ण माहिती.
सरकारी योजना, गुंतवणूक, लाईफस्टाईल टिप्स आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्या वाचा मोफत इथे क्लिक करून
इंजिन
या इलेक्ट्रिक स्कूटरच्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, ग्लोबल मॉडेलप्रमाणे, यात 50.4 V आणि 19.2 V चे दोन बॅटरी पॅक मिळण्याची अपेक्षा आहे. ते 2.5 kW च्या इलेक्ट्रिक मोटरला जोडले जाईल. यामाहाची ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जमध्ये 70 किमीची रेंज देऊ शकेल.
डिझाइन
यामाहाची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर मॅक्सी स्टाईलमध्ये डिझाइन केली जाईल, ज्यामध्ये एलईडी हेडलॅम्प आणि टेललॅम्प, रुंद अलॉय व्हील्स, आरामदायी सीट आणि 27-लिटर अंडरसीट स्टोरेज आणि इतर अनेक फीचर्स मिळू शकतात.
फीचर्स
यामाहा इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये एलसीडी इन्स्ट्रुमेंट कन्सोल, स्मार्ट की इंटिग्रेशन, एबीएस, टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि मागील मोनोशॉक, डिजिटल डिस्प्ले यासह अनेक उत्कृष्ट फीचर्स मिळण्याची अपेक्षा आहे. यासोबतच या इलेक्ट्रिक स्कूटरला रायडरच्या सुरक्षेसाठी पुढच्या बाजूला डिस्क ब्रेक आणि मागच्या चाकांवर ड्रम ब्रेक मिळू शकतात.
किंमत
यामाहा इलेक्ट्रिक स्कूटर युरो 3,099 (अंदाजे 2.58 लाख रुपये) च्या किमतीसह युरोपियन बाजारात लॉन्च करण्यात आली. त्याच वेळी, अशी अपेक्षा आहे की या स्कूटरची भारतात किंमत सुमारे 2.50 लाख रुपये असू शकते.
हे पण वाचा :- Tata Upcoming CNG Cars: खुशखबर ! टाटा लाँच करणार ‘ह्या’ तीन जबरदस्त सीएनजी कार्स