Winter Car Care: जवळपास संपूर्ण देशातच आता हिवाळा सुरु झाला आहे. हिवाळ्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यात एक अडचण म्हणजे सकाळी सकाळी कार सुरु करणे.
अशा परिस्थितीत, आपण आपल्या कारच्या देखभालीची विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमची या समस्यापासून सुटका होऊ शकते.
कार सर्विस
खूप महत्वाची आहे जरी प्रत्येक हंगामात कार सर्विस आवश्यक आहे, परंतु हिवाळ्यात कार सर्विस अजिबात चुकवू नका आणि वेळेवर वाहनाची सर्विस करा . तुम्ही हिवाळ्यात कुठेतरी लाँग ड्राईव्हला जात असाल तर कारची सर्व्हिसिंग जरूर करा.
स्पार्क प्लगपासून ते इलेक्ट्रिकल पार्ट्सपर्यंत तपासणे आवश्यक आहे
थंड हवामानात, कधीकधी खराब स्पार्क प्लगमुळे कार सुरू होत नाही. त्यामुळे, थंडीत स्पार्क प्लग, लाइटिंग आणि वायरिंगसारख्या कारची इलेक्ट्रिकल यंत्रणा तपासा. स्पार्क प्लगच्या साहाय्याने कारचे इंजिन बराच काळ चालू राहते.
कूलंट तपासा
कारमधील कूलंटचे प्रमाण तपासा, कारण प्रवास करताना ते तुमच्या कारला थंड ठेवण्यास मदत करते.हिवाळ्याच्या मोसमात कूलंट योग्य प्रकारे काम करत राहणेही महत्त्वाचे आहे. कूलंटचे कार्य केवळ गरम इंजिन थंड करणेच नाही तर इंजिनला सामान्य तापमानात ठेवणे देखील आहे. म्हणूनच कूलंटचे कोणत्याही ऋतूमध्ये योग्यरित्या काम करत असणे महत्वाचे आहे.
टायर्सची काळजी घेणे आवश्यक आहे
हिवाळ्याच्या काळात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. टायरमध्ये काही क्रॅक असल्यास, जर तो खूप खराब झाला असेल तर तो बदलावा. हिवाळ्यात टायरमधील हवेचा दाब कमी असेल तर गाडी घसरण्याचा धोका जास्त असतो. हिवाळ्यात रस्त्यावरील दमटपणामुळे हे अधिक होते. त्यामुळे लांब अंतरावर जाण्यापूर्वी टायर तपासून घ्या.
बॅटरी तपासा
हिवाळ्यात कारची बॅटरी तपासणे खूप महत्वाचे आहे, कारण बहुतेक समस्या बॅटरीमुळेच येतात. थंडी सुरू होताच तुम्ही तुमच्या कारची बॅटरी नक्कीच तपासली पाहिजे. जर बॅटरी 3 वर्षांपेक्षा जास्त जुनी असेल तर ती बदलून घ्या.
हे पण वाचा :- Tata Cars Price Hike: ग्राहकांना धक्का ! टाटाने 30000 रुपयांनी महाग केली ‘ही’ कार ; आता खरेदीसाठी मोजावे लागणार ‘इतके’ पैसे