Upcoming 7 Seater Car : Citroën आपल्या CC4 कोडनेम असलेल्या नवीन 3-रो SUV वर काम करत असल्याची माहिती समोर आली आहे . ही दमदार कार 2023 च्या अखेरीस भारतीय बाजारपेठेमध्ये एन्ट्री करणार असल्याची सध्या बाजारात चर्चा सुरु आहे.
CC4 च्या उत्पादन मॉडेलला C3 Aircross म्हटले जाऊ शकते. हे CMP मॉड्यूलर प्लॅटफॉर्मवर आधारित असेल आणि त्याचा व्हीलबेस 2.62 मीटर आणि एकूण लांबी 4.40 मीटर असेल. रिपोर्ट्सनुसार आगामी 7 सीटर कार सध्याच्या सिट्रोएन सी3 वर आधारित असेल, जी सध्या भारतात विकली जात आहे.
याची किंमत 6 ते 7 लाख रुपयांमध्ये येऊ शकते असे मानले जाते. रिपोर्ट्सनुसार, नवीन मॉडेलमध्ये नवीन डिझाइनसह स्प्लिट हेडलॅम्प्स दिसू शकतात. इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, नवीन Citroen 7-सीटर SUV मध्ये 1.2-लिटर 3-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन दिले जाईल जे 110bhp पॉवर आणि 190Nm टॉर्क निर्माण करेल. याशिवाय 1.2 लीटर 3-सिलेंडर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनचा पर्याय यामध्ये मिळू शकतो. जे 82bhp पॉवर आणि 115Nm टॉर्क जनरेट करते. हे दोन्ही इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येऊ शकतात.
डिझाइन
नवीन Citroen C3 एअरक्रॉसच्या डिझाईनमध्ये नवीनता दिसून येते, परंतु सध्याच्या Citroen C3 हॅचबॅकची झलकही यामध्ये पाहायला मिळते. यामध्ये 16 आणि 17 इंच टायर वापरता येतील. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर C3 मध्ये 10-इंच फ्री-स्टँडिंग टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम मिळू शकते. सुरक्षेसाठी, यात एअरबॅग्ज आणि अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम सारखी फीचर्स मिळू शकतात. या मॉडेलची थेट स्पर्धा एर्टिगा आणि ट्रायबरशी होईल.
हे पण वाचा :- Maruti Brezza SUV : नवीन वर्षाचा धमाका! फक्त 3 लाखांमध्ये खरेदी करा मारुती ब्रेझा ; होणार मोठी बचत