Top 10 CNG Cars: देशात वाढत असणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलचे दर पाहून आज बहुतेक ग्राहक स्वतःसाठी कार खरेदी करताना उत्तम मायलेजमुळे सीएनजी कारला पहिली पसंती देत आहेत.
सध्या भारतीय ऑटो मार्केटमध्ये देखील सीएनजी कार्सची मागणी झपाट्याने वाढत आहे. तुम्ही देखील नवीन सीएनजी कार खरेदीचा विचार करात असला तर आम्ही तुम्हाला देशात उपलब्ध असणाऱ्या टॉप 10 कार्सबद्दल माहिती देणार आहोत.
1. Maruti Alto 800
मारुतीची सर्वात स्वस्त सीएनजी कार अल्टो 800 आहे. Alto 800 CNG मध्ये 0.8-लिटर पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे. हे 41PS पॉवर आणि 60Nm टॉर्क जनरेट करते. त्याचे सीएनजी मॉडेल 31.59 किमी मायलेज देण्यास सक्षम आहे.
2. Maruti S-Presso
S-Presso मारुती सीएनजी किटसह 1-लिटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिनसह येते. हे 57PS पॉवर आणि 82.1Nm टॉर्क जनरेट करते. त्याचे सीएनजी मॉडेल 32.73 किमी मायलेज देऊ शकते.
3. Tata Tiago
टाटा ने यावर्षी Tiago आणि Tigor चे CNG मॉडेल लॉन्च केले, ज्यामध्ये 1.2-लीटर पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे. Tiago चे इंजिन 73PS पॉवर आणि 95Nm टॉर्क जनरेट करते. त्याचे मायलेज 26.49 किमी आहे.
4. Maruti WagonR
सीएनजी किट वॅगनआरच्या 1-लिटर पेट्रोल इंजिन मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. हे 57PS पॉवर आणि 82.1Nm टॉर्क जनरेट करते. त्याचे प्रमाणित मायलेज 34.05 किमी/किलो सीएनजी आहे.
5. Maruti Celerio
मारुती सेलेरियो सीएनजी 1-लिटर पेट्रोल इंजिनसह येते, जे 57PS पॉवर आणि 82Nm टॉर्क जनरेट करते. हे 35.6 किमी/किलो CNG पर्यंत मायलेज देऊ शकते.
6. Hyundai Grand i10 Nios
Grand i10 Nios ला CNG किटसह 1.2-लीटर पेट्रोल इंजिन मिळते, जे 69PS आणि 95.2Nm पॉवर निर्माण करते. यात 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
7. Tata Tigor
टिगोर सीएनजी 1.2 लीटर पेट्रोल इंजिनसह येते. हे CNG मोडमध्ये 73PS पॉवर आणि 95Nm टॉर्क जनरेट करते. त्याचे प्रमाणित मायलेज 26.49 किमी/किलो सीएनजी आहे.
8. Maruti Swift
मारुती स्विफ्टमध्ये 1.2L DualJet पेट्रोल इंजिनसह CNG किट देण्यात आले आहे. CNG मोडमध्ये हे इंजिन 77PS पॉवर आणि 98.5Nm टॉर्क जनरेट करते. ही कार 30.90 किलोमीटरपर्यंत मायलेज देऊ शकते.
9. Maruti Dzire
DZire ही मारुतीच्या पोर्टफोलिओमधील एकमेव सेडान आहे जी सीएनजी किटसह येते. याला स्विफ्ट सीएनजी प्रमाणेच पॉवरट्रेन आणि ट्रान्समिशन मिळते. हे 31.12 किमी पर्यंत मायलेज देऊ शकते.
10. Maruti Baleno/Toyota Glanza
बलेनो आणि ग्लान्झा दोन्ही सीएनजी किटसह समान 1.2-लीटर पेट्रोल इंजिनसह ऑफर केले आहेत. त्यांच्या CNG मॉडेलला 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळतो. त्यांचे प्रमाणित मायलेज 30.61 किमी/किलो आहे.
हे पण वाचा :- Royal Enfield : ‘ही’ चिनी बाईक कंपनी देणार रॉयल एनफिल्डला आव्हान ! लॉन्च करणार ‘ह्या’ दमदार 4 नवीन मॉडेल्स