जगभरातील श्रीमंत व्यक्तींची नावे जाणून घेण्यासाठी व त्यांच्या संपत्तीत किती वाढ झाली किंवा किती कमी झाली हे जाणून घेण्यास प्रत्येक हौशी माणूस उत्सुक असतो.
आज आम्ही या हौशी माणसांसाठी जगभरातील टॉप टेन बिलिनियरमध्ये दोन भारतीय कसा डंका वाजवत आहेत ते जाणून घेऊ.
सरकारी योजना, गुंतवणूक, लाईफस्टाईल टिप्स आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्या वाचा मोफत इथे क्लिक करून
वास्तविक भारतातील दिग्गज उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे अध्यक्ष मुकेश अंबानी पुन्हा जगातील टॉप-10 श्रीमंत लोकांमध्ये सामील झाले आहेत. ब्लूमबर्गच्या अब्जाधीशांच्या यादीनुसार, त्यांची एकूण संपत्ती $103 अब्ज (7.7 लाख कोटी रुपये) झाली आहे.
गौतम अदानी सहाव्या क्रमांकावर आहेत अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी जगातील टॉप-10 श्रीमंतांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती $119 अब्ज आहे. या वर्षात आतापर्यंत अदानींच्या संपत्तीत $42.4 बिलियनची वाढ झाली आहे. अदानी समूहाच्या एकूण सात कंपन्या भारतीय स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध आहेत.
ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून आरआयएलच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याने मुकेश अंबानींच्या संपत्तीत वाढ झाली आहे. बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसांत त्यांची संपत्ती $5.50 अब्जने वाढली आहे. 2022 मध्ये मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत आतापर्यंत 13.3 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.
RIL चे शेअर्स तीन दिवसात 9.61 टक्क्यांनी वाढले: गेल्या तीन दिवसात RIL च्या शेअर्समध्ये 9.61 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीचा स्टॉक 18 एप्रिल रोजी 2544.15 रुपये प्रति युनिटवर बंद झाला, जो 21 एप्रिल रोजी 2788.80 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला. तथापि, शेवटी तो प्रति शेअर रु. 2781.15 वर बंद झाला.
अदानी विल्मर देखील तेजीत अदानी विल्मार 8 फेब्रुवारी 2022 रोजी रु. 227 मध्ये सूचीबद्ध झाले. आज अवघ्या 73 दिवसांत हा शेअर 227 रुपयांवरून 667.90 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास तिप्पट केले आहेत. अदानी विल्मारने एका महिन्यात 75.86 टक्के परतावा दिला आहे. त्याचा आतापर्यंतचा उच्चांक 709 रुपये आहे.