Tata Upcoming CNG Cars: खुशखबर ! टाटा लाँच करणार ‘ह्या’ तीन जबरदस्त सीएनजी कार्स

Tata Upcoming CNG Cars:  मागच्या काही दिवसांपासून भारतीय बाजारात CNG कार्सची मागणी झपाटयाने वाढत आहे. वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पाहता ग्राहक सीएनजी कार्स खरेदीला जास्त प्राधान्य देत आहेत.

याचा मुख्य कारण म्हणजे सीएनजीमध्ये जबरदस्त मायलेज मिळतो. यातच आता मार्केटमध्ये एका पेक्षा एक सीएनजी कार्स लाँच होत आहे. तर आता समोर आलेल्यामाहिती नुसार टाटा देखील लवकरच तीन नवीन सीएनजी कार घेऊन येत आहे.

पंच, नेक्सॉन आणि अल्ट्रोजचा सीएनजी अवतार

रिपोर्ट्सनुसार, टाटा मोटर्स त्यांच्या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या पंच, नेक्सॉन आणि अल्ट्रोजचा CNG अवतार घेऊन येत आहे. यापूर्वी टाटा मोटर्सने टियागो आणि टिगोरच्या सीएनजी व्हर्जन लाँच केल्या होत्या, ज्यांची विक्री देखील चांगली होत आहे.

कंपनी पुढील वर्षी (2023) या तीन वाहनांचे सीएनजी मॉडेल आणणार आहे. या तीन वाहनांशिवाय कंपनी इतर काही वाहनांची सीएनजी मॉडेल्सही आणत आहे. मात्र याबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारच्या यादीत पंच, नेक्सॉन आणि अल्ट्रोजचा समावेश आहे, त्यामुळे त्यांच्या सीएनजी अवतारच्या आगमनाने विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे, किमतीबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही मात्र पेट्रोल-डिझेल त्यांच्या त्यापेक्षा किंचित जास्त किंमत अपेक्षित आहे. सध्या देशातील सीएनजी कार मार्केटमध्ये मारुती सुझुकीचे वर्चस्व आहे. अशा परिस्थितीत आता फक्त ग्राहकांना टाटाच्या नवीन सीएनजी रेंजचा फायदा होणार आहे.

हे पण वाचा :-  Toyota Glanza CNG 30km मायलेजसह करणार दमदार एंट्री ! बुकिंग सुरू झाले; ‘या’ दिवशी होणार लॉन्च