Tata punch EV: प्रतीक्षा संपली ! ‘या’ दिवशी लाँच होणार नवीन टाटा पंच ईव्ही ; किंमत असेल फक्त ..

Tata punch EV: भारतीय ऑटो बाजारात सध्या इलेक्ट्रिक कार्स सेगमेंटमध्ये देशाची सर्वात लोकप्रिय कंपनी पैकी एक असणारी टाटा मोटर्स राज्य करत आहे. कंपनी कमी किमतीमध्ये नवीन नवीन इलेक्ट्रिक कार्स लाँच करून ग्राहकांना आकर्षित करत आहे.

सध्या कंपनीकडे Tiago EV, Tigor EV, Nexon EV Prime आणि Nexon EV MAX सारख्या बजेट रेंजमध्ये इलेक्ट्रिक कार्स आहे. जे ग्राहक मोठ्या प्रमाणत खरेदी देखील करत आहे. यातच आता कंपनी पुन्हा एकदा मोठा धमाका करणार आहे.

भारतीय बाजारात कंपनी लवकरच आपली लोकप्रिय कार टाटा पंचचा ईव्ही व्हर्जन मार्केटमध्ये लाँच करणार आहे. कंपनीने याची पुष्टी केली आहे. म्हणजेच आता तुम्हाला परवडणारी इलेक्ट्रिक एसयूव्ही चालवण्याची संधी मिळणार आहे. या मॉडेलशी संबंधित अनेक माहिती आमच्या निदर्शनास आली आहे. सूत्रानुसार, टाटा पंच EV लाँच झाल्यानंतर भारतातील पहिली इलेक्ट्रिक EV मायक्रो SUV असेल.

यावेळी कंपनीकडून माहिती मिळाली आहे. सध्या, भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tiago EV आहे आणि तिची किंमत देखील 10 लाखांपेक्षा कमी आहे. Tata Punch EV केव्हा लॉन्च होईल याबद्दल कंपनीकडून माहिती मिळाली आहे की ती पुढील वर्षी (2023) जुलै नंतर लॉन्च केली जाईल. सूत्रानुसार, पंच EV ची किंमत देखील 10 लाखांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. बरं, उत्पादन मॉडेल तयार आहे. काही काळापूर्वीच्या रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की या नवीन ईव्ही मॉडेलची चाचणी केली जात आहे.

पूर्ण चार्ज मध्ये 300 किमी धावेल

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नेक्सॉन ईव्ही आणि टिगोर ईव्ही सारख्या नवीन टाटा पंच ईव्हीमध्ये Ziptron तंत्रज्ञान दिसेल. नवीन पंच EV मध्ये 55Kw इलेक्ट्रिक मोटर आणि 26kW लिथियम-आयन बॅटरी पॅक मिळू शकतो. हे इंजिन 74bhp पॉवर आणि 170Nm टॉर्क जनरेट करू शकते. असा विश्वास आहे की नवीन टाटा पंच EV पूर्ण चार्ज झाल्यावर 300 किमी पर्यंतची रेंज देऊ शकते. याशिवाय यामध्ये फास्ट चार्जिंगचा पर्यायही दिला जाईल.

हे पण वाचा :- Bike Discount Offers : संधी गमावू नका! ‘या’ जबरदस्त बाइक्सवर मिळत आहे मोठी सूट ; आता ‘इतक्या’ स्वस्तात आणा घरी