Tata Cars : अर्रर्र .. मारुतीनंतर आता टाटाने दिला ग्राहकांना झटका ! ‘त्या’ प्रकरणात घेणार ‘हा’ मोठा निर्णय ; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
Tata Cars : काही दिवसापूर्वीच भारतातील सर्वात मोठी ऑटो कंपनी मारुती सुझुकीने आपल्या कार्सच्या किमतीमध्ये वाढ करण्याचा एक मोठा निर्णय घेत ग्राहकांना जोरदार झटका दिला होता.
आता अशाच काही निर्णय लोकप्रिय कंपनी टाटा मोटर्स घेणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी २०२३ मध्ये कंपनी आपल्या ग्राहकांना हा धक्का देण्याची तयारी करत आहे. कंपनी आपल्या काही लोकप्रिय कार्सच्या कितमीमध्ये वाढ करू शकते.
सरकारी योजना, गुंतवणूक, लाईफस्टाईल टिप्स आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्या वाचा मोफत इथे क्लिक करून
टाटा मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक (प्रवासी वाहने आणि इलेक्ट्रिक वाहने) शैलेश चंद्र म्हणाले, “नियामक अद्यतनाचा खर्चावर परिणाम होईल. त्यांनी असेही सांगितले की कंपनीला बॅटरीच्या वाढलेल्या किमतींचा परिणाम बाजारापर्यंत पोहोचवायचा आहे.
त्यामुळे पेट्रोल-डिझेल कार्सबरोबरच टाटा इलेक्ट्रिक कारच्या किमतीही वाढणार आहेत. पुढील वर्षी ऑटो एक्स्पो 2023 मध्ये, टाटा मोटर्स त्यांचे नवीन हॅरियर आणि सफारी नवीन अवतारात सादर करेल, दोन्ही कार्समध्ये कॉस्मेटिक बदल केले जातील.
मारुती सुझुकीने किंमत वाढवण्याची घोषणा केली आहे
नुकतेच मारुती सुझुकीने आपल्या कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. म्हणजे आता नवीन मारुती कार घेण्यासाठी तुम्हाला तुमचा खिसा सोडावा लागणार आहे. पुढील वर्षापासून (जानेवारी 2023) कंपनीच्या कारच्या किमती वाढतील.
किमती वाढण्यामागे इनपुट कॉस्ट, महागाई आणि नियामक ही प्रमुख कारणे सांगितली जात आहेत. या वर्षीही मारुती सुझुकीने अनेक वेळा किमती वाढवल्या आहेत. या कार्सच्या किमती किती वाढवल्या जातील याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.
हे पण वाचा :- Toyota Cars: भारतात ‘ही’ आहे टोयोटाची सर्वात महागडी कार ; किंमत आहे 1 कोटींहून अधिक ! जाणून घ्या त्याची खासियत