Royal Enfield : ‘ही’ चिनी बाईक कंपनी देणार रॉयल एनफिल्डला आव्हान ! लॉन्च करणार ‘ह्या’ दमदार 4 नवीन मॉडेल्स
Royal Enfield: सध्या भारतीय बाजारात दुचाकींची भरपूर मागणी पहिला मिळत आहे,याच संधीचा फायदा घेत अनेक देशी- विदेशी कंपन्या आपल्या आपल्या नवीन नवीन बाइक्स मार्केटमध्ये सादर करत आहे.
आता समोर आलेल्या माहितीनुसार रॉयल एनफिल्डला टक्कर देण्यासाठी लवकरच भारतीय बाजारात QJ motor ही चीनी कंपनी दमदार एंट्री घेणार आहेत. चीनची सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी QJ आता भारतात आपल्या 4 बाइक्स लाँच करण्याच्या तयारीत आहे.
सरकारी योजना, गुंतवणूक, लाईफस्टाईल टिप्स आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्या वाचा मोफत इथे क्लिक करून
QJ ही चीनमधील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी आहे आणि स्त्रोतावर विश्वास ठेवला तर, आता ही कंपनी आदिश्वर ऑटो राइड इंडिया (AARI) च्या माध्यमातून भारतीय बाजारपेठेत प्रवेश करणार आहे.
आम्ही तुम्हाला सांगूया, आदिश्वर ऑटो राइड इंडिया (AARI) हे त्याचे वितरण भागीदार आहे जे सध्या भारतात QJ मोटरच्या उत्पादनांची विक्री सेवा पाहत आहे. आता आदिश्वर मोटो व्हॉल्ट शोरूमद्वारे भारतात 4 नवीन QJ बाइक लॉन्च करेल आणि उपलब्ध करून देईल.
QJ मोटर केवळ भारतातच आपल्या 4 नवीन बाईक सादर करणार नाही तर इतर 130 देशांमध्येही प्रवेश करेल. QJ मोटर आपल्या चार बाईक CKD मार्गाने आणण्याच्या तयारीत आहे. या 4 मोटरसायकलमध्ये SRC250, SRC 500, SRV 300 आणि SKR 400 यांचा समावेश आहे. SRC 250 बाईकला 250cc इंजिन मिळेल, याशिवाय SRC500 मॉडेलला 500cc इंजिन, SRV300 मध्ये 300cc इंजिन आणि शेवटी SRK400 ला 400cc इंजिन मिळेल.
हे पण वाचा :- MG Air Electric Car: मोठी बातमी ! ‘या’ दिवशी लॉन्च होणार एमजीची स्वस्त इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या त्याची खासियत