Royal Enfield Himalayan : रॉयल एनफील्ड हिमालयन नवीन अवतारात लॉन्च ! किंमत आहे फक्त ..

Royal Enfield Himalayan :  लोकप्रिय बाइक उत्पादक कंपनी Royal Enfield ने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मार्केटमध्ये नवीन कलर ऑप्शन आणि नवीन फीचर्ससह  आपली दमदार बाइक Royal Enfield Himalayan लॉन्च केली आहे.

जर तुम्ही देखील Royal Enfield Himalayan खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला यासाठी  2.15 लाख रुपये (एक्स-शोरूम) मोजावे लागणार आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो कि कंपनीने या दमदार बाइकच्या यांत्रिक फीचर्समध्ये कोणताही बदल केलेला नाही. चला तर जाणून घ्या या दमदार बाइकबद्दल संपूर्ण माहिती.

नवीन पेंट थीम आणि फीचर्स

रॉयल एनफील्ड हिमालयनला अलीकडे तीन नवीन पेंट थीमच्या रूपात रंग अपडेट प्राप्त झाला आहे. यात एकूण 6 रंग पर्याय आहेत, ज्यामध्ये ग्रेव्हल ग्रे, पाइन ग्रीन आणि ग्रॅनाइट ब्लॅकच्या विद्यमान रंग पॅलेटमध्ये आता ड्यून ब्राउन, ग्लेशियर ब्लू आणि स्लीट ब्लॅक समाविष्ट आहे. परंतु कंपनीने लेक ब्लू, रॉक रेड आणि मिराज सिल्व्हर पेंट थीम बंद केल्या आहेत.

कलर अपडेटसोबतच यूएसबी पोर्टचाही समावेश करण्यात आला आहे. गोल हेडलाइट्स, टिंटेड विंडस्क्रीन, बीक-स्टाईल फ्रंट फेंडर, स्प्लिट-सीट, साइड-स्लंग एक्झॉस्ट आणि वायर-स्पोक व्हील बाइकला अधिक चांगला डिझाइन लुक देण्यात मदत करतात. या बाइकची खास गोष्ट म्हणजे तिची राइड क्वालिटी अतिशय स्मूथ आहे.

इंजिन आणि पॉवर

इंजिनबद्दल बोलायचे झाले तर बाइकला 411cc सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे जे 24.3bhp पॉवर आणि 32Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5 स्पीड गियर बॉक्सने सुसज्ज आहे. हे इंजिन पॉवरफुल आहे आणि सर्व हवामानात चांगली कामगिरी करते. ऑफ रोडवर लोक या बाईकचा जास्त वापर करतात. यात 21/17-इंच स्पोक व्हील्स, ABS आणि ट्रिपर नेव्हिगेशन सिस्टम आहे.

हे पण वाचा :- Cars Prices Hike :  अर्रर्र .. ‘या’ कंपनीनेही दिला ग्राहकांना धक्का ! कार्सच्या किमतींमध्ये केली ‘इतकी’ वाढ