Royal Enfield Cheapest Bike: तुम्ही देखील नवीन बाइक खरेदी करण्याचा विचार करत असला तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला सध्या भारतीय ऑटो मार्केटमध्ये धुमकाकुळ घालणारी बाइक Royal Enfield Hunter 350 बद्दल सांगणार आहोत.
आम्ही तुम्हाला सांगतो कंपनीच्या या स्वस्त बाइक खरेदीसाठी मार्केटमध्ये चांगलीच गर्दी जमली आहे. आता पर्यंत कंपनीने या स्वस्त बाइकचे 50,000 हून अधिक युनिट्सची विक्री केली आहे.
या दमदार बाइकची डिजाइन आणि उत्तम फीचर्स पाहता ग्राहक सध्या या बाइकची मार्केटमध्ये प्रचंड मागणी करत आहे.तुम्ही देखील आता नवीन बाइक खरेदी करणार असला तर तुम्ही ही बाइक देखील खरेदी करू शकतात. चला तर जाणून घ्या या जबरदस्त बाइकबद्दल संपूर्ण माहिती.
इंजिन आणि पॉवर
इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, या बाईकमध्ये फ्युएल इंजेक्शन टेक्नॉलॉजीसह 349cc इंजिन आहे, जे 20.2 bhp पॉवर आणि 27Nm टॉर्क देते आणि त्याला 5-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. हे इंजिन इंधन इंजेक्शन तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. या बाईकचा टॉप स्पीड 114 kmph आहे.
ही बाईक ड्युअल चॅनल एबीएस सिस्टीमने सुसज्ज आहे, तिच्या समोर 300mm डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस 270mm डिस्क ब्रेक आहे. कंपनीचा दावा आहे की ही बाईक 36.2 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते.
दर महिन्याला विक्री वाढत आहे
Royal Enfield च्या नवीन Hunter 350 बाईकची मागणी झपाट्याने वाढत आहे, विक्रीचे परिणाम पाहता, हंटर 350 ने ऑगस्ट महिन्यात 18,197 युनिट्सची विक्री केली, त्यानंतर सप्टेंबरमध्ये ती वाढून 17,118 युनिट्स झाली. गेल्या महिन्यात कंपनीने 15,445 मोटारींची विक्री नोंदवली.
हे पण वाचा :- Maruti Suzuki WagonR : 34km मायलेज असलेली मारुती सुझुकी वॅगनआर खरेदी करणार असला तर जाणून घ्या त्याची खासियत नाहीतर होणार ..