Renault Car Discount: संधी गमावू नका ! रेनॉल्ट कार्सवर मिळत आहे जबरदस्त डिस्काउंट ; होणार हजारोंची बचत

Renault Car Discount : देशात असे अनेक लोक आहे ज्यांना या दिवाळीत कार खरेदी करता आली नाही मात्र पुन्हा एकदा ही सुवर्णसंधी आली आहे. ग्राहकांसाठी रेनॉल्टने एक जबरदस्त ऑफर जाहीर केली आहे.

या ऑफेरमुळे ग्राहकांचे हजारो रुपयांची बचत होणार . कंपनीने या महिन्यात Kwid, Triber आणि Kiger सारख्या मॉडेल्सच्या खरेदीवर कमाल 35,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट जाहीर केला आहे. ही सवलत रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट सवलत या स्वरूपात मिळू शकते आणि ती केवळ नोव्हेंबर महिन्यासाठी वैध आहे.

Renault Kiger

या महिन्यात Renault Kiger वर देखील मोठी सूट आहे. Renault Triber आणि Kwid प्रमाणेच RELIVE स्क्रॅपपेज प्रोग्राम अंतर्गत 10,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज फायदे देखील मिळू शकतात. याशिवाय, ग्रामीण ऑफर आणि कॉर्पोरेट सवलती उर्वरित मॉडेल्सप्रमाणेच राहतील.

Renault Triber MPV

नोव्हेंबरमध्ये Renault Triber वर सर्वात मोठी सूट दिली जात आहे. त्याच्या खरेदीवर कमाल 35,000 रुपयांपर्यंत बचत केली जाऊ शकते. यामध्ये, REX व्हेरियंट वगळता 10,000 रुपयांपर्यंत रोख सवलत, एक्सचेंज बेनिफिट म्हणून 15,000 रुपयांपर्यंत आणि कॉर्पोरेट फायद्यांसाठी 10,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. या ऑफर व्यतिरिक्त, ग्रामपंचायत सदस्यांना 5,000 रुपयांची सवलत मिळू शकते, तर RELIVE स्क्रॅपेज प्रोग्राम अंतर्गत जास्तीत जास्त 10,000 रुपयांचा एक्स्चेंज बेनिफिट मिळू शकतो.

Renault Kwid

नोव्हेंबरमध्ये रेनॉल्ट क्विडमध्ये 30,000 रुपयांपर्यंत बचत होऊ शकते. निवडक व्हेरियंटवर रोख सवलत म्हणून 10,000 रुपये आणि कॉर्पोरेट सूटसाठी 10,000 रुपयांपर्यंत ऑफर आहे. Kwid च्या RXE व्हेरियंट व्यतिरिक्त, बाकीच्या व्हेरियंटना देखील 10,000 रुपयांचा एक्सचेंज लाभ मिळत आहे.

हे पण वाचा :-  Kia Car Price Hike: कियाने दिला ग्राहकांना धक्का ! ‘या’ कारच्या किंमतीमध्ये केली वाढ ; आता मोजावे लागणार ‘इतके’ पैसे