New Car : नवीन कार घेण्यासाठी पुढच्या वर्षाची वाट पाहू नका, जाणून घ्या काय आहे कारण

New Car : प्रत्येकाला स्वतःची नवीन कार (New Car) घ्यायची असते. सणासुदीचा हंगाम (festive season) सुरू झाला आहे आणि अनेकजण नवीन कार घरी आणण्यासाठी ही चांगली वेळ मानतात.

हे पण वाचा :- Maruti Suzuki Car : मार्केटमध्ये खळबळ ! मारुती सुझुकीने सादर केली नवीन CNG कार ; मायलेज तुम्ही व्हाल थक्क!

सणासुदीच्या काळात नवीन कार खरेदीवर आकर्षक सवलतींसह इतरही अनेक ऑफर्स आहेत. पण काही लोक सणासुदीच्या काळात गाडी न घेऊन नवीन वर्षाची वाट पाहत असतात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही नवीन कार घेण्यासाठी 2023 ची वाट पाहत असाल तर ही प्रतीक्षा तुमच्यासाठी महागडी ठरू शकते.

किंमत वाढू शकते

अहवालानुसार 2023 मध्ये वाहनांच्या किमती वाढू शकतात. वाढत्या महागाईच्या काळात वाहनांच्या किमती वाढणे ही नित्याची बाब झाली आहे. परंतु 2023 मध्ये नवीन कार खरेदी करणे आणखी महाग असू शकते याची इतर कारणे आहेत.

हे पण वाचा :- Electric Vehicles : ‘या’ राज्यात कार खरेदीवर मिळणार 1 लाख रुपयांची सूट ! सरकारने केली मोठी घोषणा ; वाचा सविस्तर

BS6 एमिशनचा दुसरा टप्पा पुढील वर्षी एप्रिलपासून सुरू होऊ शकतो. त्यानुसार वाहन उत्पादकांनी त्यांच्या वाहनांमध्ये आवश्यक ते बदल करण्याची तयारी सुरू केली असून, त्यासाठी नवीन उपकरणे वापरण्यात येणार आहेत.

अशा परिस्थितीत नवीन वाहन (both car and bike) खरेदी करणे महाग होईल. यासोबतच सुरक्षिततेचा विचार करून कारसाठी 6 एअरबॅग अनिवार्य करण्याचा नियमही पुढील वर्षी ऑक्टोबरपासून लागू केला जाऊ शकतो. नवीन कार खरेदी करणे देखील तुमच्या खिशाला अधिक जड जाईल.

हे पण वाचा :- Electric Scooter: ‘त्या’ प्रकरणात बजाज चेतक देणार ओला आणि एथरसारख्या कंपन्यांना टक्कर ; जाणून घ्या काय आहे कारण