मल्टीबॅगर स्टॉक हे गुंतवणुकदारांना तूफान नफा देत असतात. शेअर मार्केटमध्ये असे अनेक मल्टीबॅगर स्टॉक्स आहेत जे तुम्हाला भरपूर परतावा देऊन करोडपती बनवू शकतात.
आज आपण अशाच काही स्टॉक बाबत जाणून घेणार आहोत. गेल्या 15 दिवसांपासून शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता आहे. सोमवारी सेन्सेक्स आणि निफ्टी कोसळले.
सरकारी योजना, गुंतवणूक, लाईफस्टाईल टिप्स आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्या वाचा मोफत इथे क्लिक करून
असे असूनही, काही चिलर्स म्हणजेच पेनी स्टॉकने जोरदार नफा दिला. आज आम्ही 7 रुपयांखालील शेअर्स कामगिरीबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी केवळ 15 दिवसांत गुंतवणूकदारांचे पैसे जवळजवळ दुप्पट केले.
या यादीत उषा मार्टिन एज्युकेशन अँड सोल्युशन्सचं पहिलं नाव आहे. एक वर्षापूर्वी, 2 रुपये 65 पैशांचा हा शेअर गेल्या 15 दिवसांत 88.06 टक्क्यांनी वाढून 6.30 रुपयांवर पोहोचला आहे.
उषा मार्टिनने एका आठवड्यात 13.51 टक्के आणि 3 वर्षांत 293 टक्के परतावा दिला आहे. पेनी स्टॉकचे दुसरे नाव आल्प्स इंडस्ट्रीज आहे.
या स्टॉकने 15 दिवसांत 87 टक्के परतावा दिला आहे. या समभागाने गेल्या एका आठवड्यात 13.48 टक्के आणि एका वर्षात 215 टक्के परतावा दिला आहे.
सोमवारी शेअर बाजारात मोठी घसरण होऊनही शेअर 4.12 टक्क्यांच्या वाढीसह 5.05 रुपयांवर बंद झाला. राज रायनचे नाव 15 दिवसांत जबरदस्त नफा देणाऱ्या पेनी स्टॉकपैकी एक आहे.
केवळ 2 रुपये 90 पैशांचा हा शेअर गेल्या 15 दिवसांत 81.25 टक्क्यांनी वाढला आहे. एका महिन्यात 107% परतावा दिला आहे. एका वर्षात ते एक लाख ते 14 लाखांहून अधिक झाले आहे.