MPV Cars : जर तुमचे कुटुंब मोठे असेल किंवा तुम्हाला टॅक्सी सेवेसाठी 7 सीटर कार घ्यायची असेल, तर ही बातमी नक्की वाचा आम्ही तुम्हाला त्या 5 बेस्ट सेलिंग कारबद्दल सांगण्यात येणार आहे ज्या तुम्ही पर्याय म्हणून निवडू शकता.
Maruti Suzuki Ertiga
सरकारी योजना, गुंतवणूक, लाईफस्टाईल टिप्स आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्या वाचा मोफत इथे क्लिक करून
1,21,541 युनिट्सची विक्री केल्यानंतर, मारुती सुझुकी एर्टिगाने भारतात सर्वाधिक विक्री होणाऱ्या MPV च्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. 2022 मध्ये आतापर्यंत 1,21,541 युनिट्सची विक्री झाली आहे. या MPV मध्ये 1.5-लिटर पेट्रोल इंजिन वापरण्यात आले आहे, जे 99 hp पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. हे पाच-स्पीड एमटी आणि 6-स्पीड एटी प्रकारांसह येते. भारतीय बाजारपेठेत मारुती सुझुकी एर्टिगाची किंमत रु. 8.35 लाख ते रु. 12.79 लाख आहे. (दोन्ही किमती एक्स-शोरूम आहेत)
Kia Carens
Kia Carens या वर्षी दुसरी सर्वाधिक विक्री होणारी MPV बनण्यात यशस्वी ठरली. जानेवारीपासून भारतात 59,561 युनिट्सची विक्री झाली असून, Kia Carens तीन इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे – 1.5-लीटर पेट्रोल, 1.4-लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.5-लिटर डिझेल. Kia कंपनीने देशातील सर्वात स्वस्त MPV म्हणून सादर केली होती.
Toyota Innova
2022 मध्ये आतापर्यंत 56,533 युनिट्सची विक्री केल्यामुळे, टोयोटा इनोव्हा ही भारतीय ग्राहकांसाठी नेहमीच लोकप्रिय निवड राहिली आहे. जुनी डिझेलवर चालणारी इनोव्हा क्रिस्टा पुढील वर्षी हायक्रॉस म्हणून लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. जुन्या इनोव्हामध्ये नसलेली अनेक लेटेस्ट फीचर्स या वाहनात पाहायला मिळतील.
Maruti Suzuki XL6
Maruti Suzuki XL6 ही भारतातील Ertiga आधारित प्रीमियम MPV आहे. 2022 मध्ये आतापर्यंत 35,000 युनिट्सची विक्री नोंदवली आहे.
Renault Triber
2022 मध्ये आतापर्यंत 31,751 युनिट्सची विक्री करून Renault Triber MPV ने पाचवे स्थान पटकावले आहे. ट्रायबर 1.0-लिटर पेट्रोल इंजिन वापरते, जे 71 bhp पॉवर जनरेट करते आणि पाच-स्पीड MT आणि AMT शी जुळते.
हे पण वाचा :- Mahindra THAR : 2 लाख रुपये स्वस्त महिंद्रा थार पुढील महिन्यात होणार लाँच! इंजिन पासून किंमत पर्यंत माहिती लीक; वाचा सविस्तर