MG EV Car :मार्केटमध्ये धुमाकुळ घाल्यासाठी येत आहे MG ची ‘ही’ जबरदस्त इलेक्ट्रिक कार ; रेंज पाहून व्हाल तुम्ही थक्क!

MG EV Car : बाजारात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी MG Motor पुन्हा एकदा भारतीय ऑटो  बाजारात चर्चेत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो कंपनी लवकरच भारतीय इलेक्ट्रिक कार्स सेगमेंटमध्ये नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार कंपनी जानेवारी 2023 मध्ये ऑटो एक्सपोमध्ये MG 4 EV चे अनावरण करेल. आम्ही तुम्हाला सांगतो या कारला  युरो NCAP क्रॅश टेस्टिंगमध्ये 5-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे.

याच बरोबर कंपनी दिल्ली एक्स्पो 2023 मध्ये अपडेटेड Hector SUV आणि 2-डोर  एअर EV देखील प्रदर्शित करेल. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या इलेक्ट्रिक कारने ऑक्यूपेंट प्रोटेक्शनसाठी 83 टक्के, चाइल्ड ऑक्यूपेंट प्रोटेक्शनसाठी 80 टक्के, पादचाऱ्यांच्या संरक्षणासाठी 75 टक्के आणि सुरक्षा सहाय्य प्रणालीसाठी 78 टक्के गुण मिळवले.

MG 4 EV फीचर्स

MG इलेक्ट्रिक हॅचबॅकमध्ये, तुम्हाला OTA अपडेटसह कनेक्टेड कार तंत्रज्ञान, हवेशीर फ्रंट सीट्स, 360-डिग्री कॅमेरा, 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 7-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, वायरलेस चार्जिंग, LED लाइटिंग इत्यादी फीचर्स मिळतील. त्याच्या सुरक्षिततेच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, इलेक्ट्रिक हॅचबॅकच्या ग्लोबल-स्पेक व्हर्जनमध्ये ड्रायव्हर अटेंशन अलर्ट, लेन कीप असिस्ट, अ‍ॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, अॅक्टिव्ह इमर्जन्सी ब्रेकिंग, हाय बीम असिस्ट, स्पीड लिमिट असिस्ट यांसारखी फीचर्स आहेत.

MG 4 EV रेंज

MG 4 EV च्या पॉवरट्रेनवर येत असताना, जागतिक मॉडेल 51kWh आणि 64kWh बॅटरी पॅक पर्यायांसह ऑफर केले गेले आहे, जे अनुक्रमे 170bhp आणि 203bhp उत्पादन करते. दोन्ही प्रकारांमध्ये सिंगल-मोटर, RWD प्रणाली आहे.

याच्या 52kWh आणि 64kWh बॅटरी 7kW AC फास्ट चार्जरने अनुक्रमे 7.5 तास आणि 9 तासांत पूर्णपणे चार्ज केल्या जाऊ शकतात, तर 150kW DC चार्जर वापरून 35 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज केल्या जाऊ शकतात. कार निर्मात्याचे म्हणणे आहे की MG 4 इलेक्ट्रिक हॅचबॅक लहान बॅटरी पॅकसह 350km पर्यंत आणि मोठ्या बॅटरी पॅकसह (WLTP सायकलवर) 452km पर्यंतची रेंज देते.

हे पण वाचा :-  Cheapest 7-Seater Car:  भारीच ..!  6 लाखांपेक्षा कमी किंमतीमध्ये खरेदी करा ‘ही’ जबरदस्त 7 सीटर कार ; जाणून घ्या त्याची खासियत