Maruti Suzuki Cars : मागच्या महिन्यात भारतीय ऑटोमार्केट मध्ये सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी म्हणजे मारुती सुझुकी होय. मागच्या महिन्यात संपूर्ण देशात विक्री होणारे टॉप 10 कार्समध्ये कंपनीची 7 कार्सचा समावेश होता.
मात्र आता याच मारुती सुझुकीच्या दोन कार्सना ग्राहकांनी नाकारले आहे. या दोन्ही कार्सची मागच्या काही दिवसांपासून विक्रीमध्ये घट होत आहे. XL6 आणि Ciaz असे या दोन्ही कार्सचे नाव आहे.
Maruti XL6 CNG लाँच
मारुती XL6 CNG एकाच Zeta MT व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. ज्याची एक्स-शोरूम किंमत 12.24 लाख रुपये आहे. XL6 ड्युअल VVT तंत्रज्ञानासह 1.5L K15C Dualjet इंजिनसह येतो.
हे 6,000 RPM वर 102 bhp आणि 4,400 RPM वर 136.8 Nm पीक टॉर्क निर्माण करते. इंजिन 5-स्पीड आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. CNG वर, त्याचे इंजिन 87 bhp पॉवर आणि 121.5 Nm पीक टॉर्क जनरेट करते. त्याचे मायलेज 20.97 किमी/किलो आहे. यात पुश स्टार्ट बटण, क्रूझ कंट्रोल, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटी सारखी फिचर्स आहेत.
सुरक्षेसाठी, यात 2 एअरबॅग देखील आहेत. यासोबतच अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम, पॉवर स्टिअरिंग, पॉवर विंडो, फॉग लाइट्स, अलॉय व्हील्स, चाइल्ड सेफ्टी लॉक, अँटी थेफ्ट अलार्म, सीट बेल्ट रिमाइंडर, स्पीड अलर्ट, ऑटोमॅटिक हेडलॅम्प, टायर प्रेशर मॉनिटर यांसारखी अनेक फीचर्स उपलब्ध आहेत.
Maruti Suzuki Ciaz फीचर्स
Maruti Suzuki Ciaz ला 1.5-लीटर पेट्रोल इंजिन मिळते, जे स्मार्ट हायब्रिड तंत्रज्ञानासह येते. हे 103 Bhp पॉवर आणि 138Nm पीक टॉर्क जनरेट करते. इंजिनसोबत 5 स्पीड मॅन्युअल आणि 4 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्याय उपलब्ध आहेत. वाहन सुमारे 20kmpl मायलेज देते. सुरक्षिततेसाठी, यात ड्युअल फ्रंट एअरबॅग, EBD सह ABS, स्पीड अलर्ट सिस्टम आणि ड्रायव्हर आणि प्रवाशांसाठी सीटबेल्ट रिमाइंडर मिळतात.
Ciaz ला एक आकर्षक फ्रंट ग्रिल, स्लीक बंपर आणि DRL सह LED प्रोजेक्टर हेडलॅम्प मिळतात. यामध्ये स्टेअरिंग व्हील ते डोर हँडल, एसी नॉब आणि पार्किंग ब्रेक लीव्हर यांसारख्या ठिकाणी क्रोमचा वापर दिसून येतो. आतील बाजूस, 7-इंच मल्टी-इन्फॉर्मेशन डिस्प्ले (MID), मागील एसी व्हेंट्स, फ्रंट आणि रिअर आर्मरेस्ट, कीलेस एंट्री, क्रूझ कंट्रोल आणि अॅडजस्टेबल ORVM सारखी फीचर्स प्रदान करण्यात आली आहेत.
हे पण वाचा :- Maruti Grand Vitara CNG भारतात होणार लाँच ! खरेदीसाठी मोजावे लागणार फक्त ‘इतके’ पैसे