Maruti Suzuki Car : तुम्ही देखील पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरामुळे बाजारात चांगली मायलेज देणारी कार शोधात असाल तर आम्ही तुम्हाला बाजारात उपलब्ध असणारी एका जबरदस्त कारबद्दल माहिती देणार आहोत जे तुम्हाला 35.6 kmpl पेक्षा जास्त मायलेज देते.
आम्ही येथे तुम्हाला Celerio हॅचबॅक CNG बद्दल माहिती देत आहोत जे ग्राहकांना 5.25 लाख ते 7 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत खरेदी करता येते. तर त्याची CNG व्हर्जनची किंमत 6.69 लाख रुपये आहे.
मायलेज आणि फीचर्स
मारुती सुझुकी सेलेरियोचे मायलेज पेट्रोलसाठी 24.97 kmpl ते CNG साठी 35.6 kmpl आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते, जी Android Auto आणि Apple CarPlay ला सपोर्ट करते. यात स्टीयरिंग व्हील माउंटेड ऑडिओ कंट्रोल्स, इंजिन स्टार्ट/स्टॉप बटण, पॅसिव्ह कीलेस एंट्री, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर (वॅगन आर मधून) सारखी फीचर्स आहेत. हे ड्युअल फ्रंट एअरबॅगसह देखील येते. एवढेच नाही तर ऑटोमॅटिक व्हेरियंटसोबत हिल-होल्ड असिस्ट देखील देण्यात आले आहे.
इंजिन आणि पॉवर
मारुती सुझुकी सेलेरियो 1.0-लिटर पेट्रोल इंजिनसह येते, ते CNG किटसह देखील दिले जाते. पेट्रोलवर हे इंजिन 67 PS पॉवर आणि 89 Nm टॉर्क जनरेट करते तर CNG वर पॉवर आउटपुट 56.7PS/82Nm राहते, जे नियमित पेट्रोल व्हर्जनपेक्षा 8.5PS/7Nm कमी आहे. पेट्रोल व्हर्जनमध्ये 5-स्पीड मॅन्युअल (स्टँडर्ड) आणि 5-स्पीड AMT पर्यायी आहे तर CNG व्हर्जनला फक्त 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळतो. कारमध्ये सेगमेंट फर्स्ट ऑटोमॅटिक आयडल स्टार्ट-स्टॉप फीचर देखील आहे.
हे पण वाचा :- Tata punch EV: प्रतीक्षा संपली ! ‘या’ दिवशी लाँच होणार नवीन टाटा पंच ईव्ही ; किंमत असेल फक्त ..