Maruti Brezza CNG : ‘या’ दिवशी लाँच होणार मारुती ब्रेझा सीएनजी! जाणून घ्या मायलेज पासून किमतीपर्यंत सर्वकाही

Maruti Brezza CNG : भारतीय ऑटो मार्केटमध्ये सध्या मारुती सुझुकी सीएनजी सेगमेंटमध्ये राज्य करत आहे. कंपनीकडे या सेगमेंटमध्ये एका पेक्षा एक सीएनजी कार्स आहे. ज्यांची ग्राहक प्रचंड मागणी करत आहे.

यातच आता पुन्हा एकदा मारुती या सेगमेंटमध्ये मोठा धमाका करणार आहे. कंपनी लवकरच आपली नवीन कॉम्पॅक्ट SUV Brezza CNG कार लाँच करणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्टमध्ये येत आहे.

इंजिन आणि पावर

सध्या, Brezza मध्ये 1.5-लीटर पेट्रोल इंजिन आहे जे 87bhp पॉवर आणि 121.5Nm टॉर्क निर्माण करते. हे 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते आणि तोच गिअरबॉक्स CNG मॉडेलमध्येही उपलब्ध असेल. सुरक्षेसाठी, या वाहनात अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि एअरबॅग्ज सारखी फीचर्स असतील.

मायलेज खूप असू शकते

नवीन मारुती ब्रेझा सीएनजीच्या मायलेजबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही, परंतु जर स्त्रोतावर विश्वास ठेवायचा असेल तर, हे वाहन 30 किमी/किलो पर्यंत मायलेज मिळवू शकते. आता जर एखादी SUV एवढा मायलेज देईल, तर त्याची विक्री वाढण्यास मदत होईल आणि दर महिन्याला भरपूर बचतही होईल. जर तुम्ही दररोज 50 किलोमीटर किंवा त्याहून अधिक अंतर प्रवास करत असाल तर ही कार तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

किंमतीत किती फरक असेल

नवीन ब्रेझा सीएनजीच्या किमतीबाबत फारशी माहिती मिळालेली नाही, परंतु यासाठी तुम्हाला 70000 ते 75000 रुपये जादा मोजावे लागतील हे निश्चित आहे. सीएनजी मॉडेल त्याच्या मिड व्हेरियंटमध्ये जोडले जाऊ शकते.

हे पण वाचा :-  Yamaha Electric Scooter: लाँग रेंजसह यामाहा लॉन्च करणार नवीन इलेक्ट्रिक स्कूटर! जाणून घ्या त्याची खासियत