Mahindra Car Offers: या दिवाळीत घरी आणा महिंद्राच्या ‘ह्या’ पॉवरफुल कार्स! 1.75 लाखांपर्यंत होणार बचत ;जाणून घ्या सविस्तर माहिती

Mahindra Car Offers:  या महिन्यात सणासुदीच्या (festive season) वातावरणात, बंपर सवलत आणि ऑफर देऊन, अनेक कार निर्माते देशभरात त्यांची काही निवडक वाहने कमी किमतीत खरेदी करण्याची उत्तम संधी देत आहेत.

हे पण वाचा :- Tata Car Festive Offers: कार खरेदीची सुवर्णसंधी! टाटाच्या ‘ह्या’ जबरदस्त कार्सवर मिळत आहे बंपर डिस्काउंट; पहा संपूर्ण लिस्ट

रोख सवलतींसोबत इतरही अनेक उत्तम ऑफर्स दिल्या जात आहेत. यापैकी महिंद्रा (Mahindra) ही देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. त्यामुळे हा सण तुमच्यासाठी नवीन महिंद्रा कार (Mahindra car) घरी आणण्याची उत्तम संधी आहे. या सणासुदीच्या हंगामात महिंद्राच्या काही मॉडेल्सवर एक नजर टाकूया ज्यामध्ये उत्तम सूट आणि इतर ऑफर आहेत.

Mahindra Bolero

महिंद्रा बोलेरो हे कंपनीच्या बर्‍याच काळापासून सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक आहे. या सणासुदीच्या मोसमात या कारलाही सूट मिळत आहे. ही कार तुम्ही 19,500 रुपयांपर्यंतच्या सूटवर घरी आणू शकता.

हे पण वाचा :- TVS Jupiter Offer: संधी गमावू नका ! फक्त 10 हजार रुपयांमध्ये खरेदी करा नवीन टीव्हीएस ज्युपिटर ; जाणून घ्या कसा मिळणार लाभ

Mahindra Scorpio

महिंद्रा स्कॉर्पिओ देखील कंपनीच्या बर्याच काळापासून सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक आहे. या सणासुदीच्या हंगामात या कारवर कंपनीकडून सर्वात मोठी सूट मिळत आहे. या कारच्या जुन्या मॉडेलवर तुम्ही 1.75 लाख रुपयांपर्यंत बचत करू शकता. यासोबतच त्याच्या खरेदीवर 20,000 रुपयांपर्यंतच्या मोफत अॅक्सेसरीजही उपलब्ध आहेत. मात्र, या कारच्या स्कॉर्पिओ एनच्या नवीन मॉडेलवर कोणतीही सूट दिली जात नाही.

Mahindra XUV300

महिंद्राच्या  SUV XUV300 च्या पेट्रोल व्हेरिएंटवर कंपनीकडून 58,500 सूट आणि इतर ऑफर दिल्या जात आहेत. त्याच वेळी, कंपनीकडून त्याच्या डिझेल व्हेरिएंटवर 52,000 रुपयांची सूट आणि इतर ऑफर दिल्या जात आहेत.

 Mahindra Mazazzo

महिंद्राच्या प्रीमियम SUV Marazzo वर 20,000 रुपयांची रोख सवलत, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5,200 रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे. या व्हेरिएंटमध्ये एकूण 35,200 रुपयांची बचत होऊ शकते.

हे पण वाचा :- Diwali Discount : भन्नाट ऑफर ! ‘ही’ कंपनी देत आहे ‘ह्या’ कार्सवर तब्बल 1 लाखांपर्यंत सूट ; जाणून घ्या संपूर्ण माहिती