LPG Cylinder Rates: साधारणतः भारतात प्रत्येक घरात एलपीजी सिलिंडरचा वापर केला जातो. दिवसेंदिवस भारतात हा वापर वाढतच आहे. यामुळे LPG सिलिंडर प्रत्येकाच्या बजेटचा भाग असतो.
त्यामुळे सिलिंडर किती महाग झाला की स्वस्त झाला हे जाणून घेण्याचीही लोकांना उत्सुकता आहे. दरम्यान तब्बल पाच महिन्यांनंतर तेल कंपन्यांनी LPG गॅस सिलिंडरच्या किमती वाढवल्या आहेत. अशातच पुन्हा एकदा देशभरात एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
सरकारी योजना, गुंतवणूक, लाईफस्टाईल टिप्स आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्या वाचा मोफत इथे क्लिक करून
त्यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत एक हजाराच्या पुढे तर कुठे हजाराच्या जवळपास पोहोचली आहे. यानंतर आता सर्वसामान्यांच्या अडचणी वाढल्या आणि वाढल्या आहेत.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की यूपीसह पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता, कंपन्यांनी जवळपास पाच महिन्यांपासून एलपीजीच्या किमतीत वाढ केलेली नव्हती.
यापूर्वी, 6 ऑक्टोबर 2021 रोजी एलपीजीच्या किमतीत शेवटचा बदल करण्यात आला होता. निवडणुकीनंतर कंपन्यांनी पुन्हा एकदा एलपीजीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
याआधी 22 मार्च रोजी घरगुती एलपीजीच्या दरात 50 रुपये प्रति सिलेंडरची वाढ करण्यात आली होती, त्यानंतर आता शनिवारी, 8 मे रोजी पुन्हा 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
दिल्लीत अनुदानित 14.2 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत 949.50 रुपयांवर पोहोचली आहे. आज किंमत वाढवल्यानंतर, दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत आता 999.50 रुपयांवर गेली आहे.
सरकारी तेल विपणन कंपन्यांनी ( OMCs) एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत 1 मे रोजी प्रति सिलेंडर 104 रुपयांनी वाढ केली आहे. ही वाढ घरगुती एलपीजी सिलिंडरमध्ये नाही तर व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये झाली आहे.
घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 19 किलो व्यावसायिक गॅसची किंमत आता 102.50 रुपयांनी वाढून प्रति सिलेंडर 2,355 रुपये झाली आहे. गेल्या महिन्यात 1 एप्रिल रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 268.50 रुपयांनी वाढली होती.