Kanda Bajarbhav : आता मी उतरतच नाही…! कांदा बाजारभावात वाढ ; कांदा साडे तीन हजारावर, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : गेल्या काही दिवसापूर्वी कांद्याला अतिशय कवडीमोल दर (Onion Rate) मिळत होता. मात्र ऑक्टोबर महिन्यातील दुसऱ्या आठवड्यापासून कांदा बाजारभावात (Onion Market Price) वाढ झाली आहे.

यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना (Onion Grower Farmer) दिलासा मिळत आहे. निश्चितच कांदा दरात झालेली ही वाढ दिवाळीच्या पर्वावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Farmer) एक मोठी भेट आहे.

मात्र असे असले तरी केंद्र शासनाने आपल्या बफर स्टॉक मधील कांदा (Onion Crop) खुल्या बाजारात विक्रीसाठी पाठवला आहे. खरं पाहता सध्या किरकोळ बाजारात कांद्याला 40 रुपये किलोचा दर मिळत आहे.

जाणकार लोकांच्या मते येत्या काही दिवसात कांद्याच्या बाजारभावात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता किरकोळ बाजारात कांद्याचा 50 रुपये किलोपर्यंत बाजारभाव जाऊ शकतो. यामुळे सामान्य जनतेला स्वस्तात कांदा उपलब्ध व्हावा या अनुषंगाने केंद्र सरकारने बफर स्टॉक मधील कांदा खुल्या बाजारात उतरवला आहे. जाणकार लोकांच्या मते, यामुळे घाऊक कांदा बाजारात घसरण होऊ शकते.

मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेता कांदा बाजारभावात सरकारच्या या निर्णयामुळे घसरण होत नसल्याचे चित्र आहे. परंतु या निर्णयामुळे कांदा दरात वाढ होत नाहीये एवढं नक्कीच. दरम्यान सध्या राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याला 1050 रुपये प्रति क्विंटल ते 1750 रुपये प्रति क्विंटल पर्यंत सर्वसाधारण बाजारभाव मिळत आहे.

आज राज्यातील पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला 3200 रुपये प्रति क्विंटलचा कमाल बाजारभाव मिळला आहे. या बाजारात आज 5647 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली होती.

आज झालेल्या लिलावात या कांद्याला 300 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून कांद्याला 3200 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजारभाव 1750 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

आज कोल्हापूर मध्ये देखील कांद्याला 2700 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. यामुळे निश्चितच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे.