Infinix Smart 7 : भन्नाट कॅमेरा आणि फीचर्ससह येणार ‘हा’ स्मार्टफोन खरेदी फक्त 7 हजारात ; जाणून घ्या सर्वकाही

Infinix Smart 7: तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन कमी बजेटमध्ये खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला बाजारात नुकतंच लाँच झालेला एका भन्नाट स्मार्टफोनबद्दल माहिती देणार आहोत . तुमच्या माहितीसाठी जाणून तुम्ही हा स्मार्टफोन अवघ्या 7 हजारात खरेदी करू शकतात. या दमदार स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6000 mAh बॅटरी, 13MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि 7GB RAM (4GB फिजिकल + 3GB व्हर्च्युअल) मिळतो. चला मग जाणून घ्या या स्मार्टफोनबद्दल संपूर्ण माहिती.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या काही दिवसापूर्वी स्मार्टफोन निर्माता Infinix ने आपला एंट्री-लेव्हल स्मार्टफोन Infinix Smart 7 भारतात लॉन्च केला आहे. Infinix Smart 7 भारतात 7299 रुपयांना लॉन्च करण्यात आला आहे. यात 4GB रॅम आणि 64GB अंतर्गत स्टोरेज आहे. हा स्मार्टफोन Azure Blue, Emerald Green आणि Night Black या रंगांमध्ये उपलब्ध असेल. हा स्मार्टफोन भारतात 27 फेब्रुवारीला फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध होईल.

Infinix Smart 7 तपशील

Infinix Smart 7 फोनमध्ये 6.6-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे जो 1600 x 720 पिक्सेल रिझोल्यूशन ऑफर करतो. हा स्मार्टफोन Unisoc SC9863A1 प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी IMG8322 GPU सह समर्थित आहे. हँडसेट 4GB रॅम आणि 64GB अंतर्गत स्टोरेज देखील देते जे 2TB पर्यंत वाढवता येते. तसेच, यात 3 जीबी व्हर्च्युअल रॅम आहे.

Infinix Smart 7 चा कॅमेरा

कॅमेऱ्यांबद्दल बोलायचे झाले तर, यात 13MP प्राथमिक सेन्सर आणि AI लेन्ससह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी स्मार्टफोनमध्ये 5MP फ्रंट फेसिंग कॅमेरा आहे. स्मार्टफोनमध्ये 6000mAh बॅटरी आहे जी 10W चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी, Infinix Smart 7 मध्ये 4G LTE, ड्युअल-बँड Wi-Fi ac, Bluetooth 5.0, GPS आणि 3.5mm ऑडिओ जॅक आहे.

हे पण वाचा :  Big Discount Offer: होणार महाबचत ! आता अवघ्या 282 रुपयांमध्ये खरेदी करा ‘हा’ दमदार स्मार्टफोन ; फीचर्स पाहून व्हाल थक्क