Hyundai Car : भारतीय ऑटो मार्केटमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. बाजारात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी आणि ग्राहकांच्या मनावर राज्य करणारी ऑटो कंपनी Hyundai ने एक मोठा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार कंपनीने आता आपली लोकप्रिय फॅमिली हॅचबॅक कार Santro बंद केली आहे. कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाईटवरून देखील ही कार काढून टाकली आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो या कारची ऑगस्ट 2022 पासून एकही युनिट्स ग्राहकांनी खरेदी केलेला नाही.
कंपनीने जाहीर केलेल्या नोव्हेंबर 2022 च्या विक्रीच्या आकडेवारीत सॅन्ट्रोची विक्री शून्य राहिली. सँट्रोने वर्षभरापूर्वी म्हणजेच नोव्हेंबर 2021 मध्ये 2,141 युनिट्सची विक्री केली होती. कंपनीने 2018 मध्ये 3.9 लाख रुपयांपासून सुरू होणाऱ्या किमतीसह सॅन्ट्रो पुन्हा लॉन्च केली. त्याच्या कमी मागणीचे एक कारण म्हणजे त्याच्या किमतीत झालेली वाढ. त्याची सुरुवातीची किंमत 4 वर्षात 5.7 लाख रुपये झाली होती.
Santro फीचर्स
सॅन्ट्रोचे मायलेज पेट्रोलमध्ये 20.3 किमी/ली आहे आणि सीएनजीमध्ये 30.48 किमी/किलो आहे जे प्रकार आणि इंधन व्हेरियंटवर अवलंबून आहे. फीचर्सच्या बाबतीत, यात Android Auto, Apple CarPlay आणि MirrorLink कनेक्टिव्हिटीसह 7.0-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, सेन्सर्ससह मागील पार्किंग कॅमेरा, रियर एसी व्हेंट्स, ड्रायव्हर साइड एअरबॅग सर्व व्हेरियंटमध्ये, EBD सह ABS आहे. सॅन्ट्रो सेगमेंटमध्ये वॅगनआर, सेलेरियो यांसारख्या वाहनांशी स्पर्धा करत होती.
Santro इंजिन
सँट्रोमध्ये 1.1-लिटर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 68hp पॉवर आणि 99Nm टॉर्क जनरेट करते. तर कारचा CNG पर्याय 58hp पॉवर आणि 84Nm टॉर्क जनरेट करतो. पेट्रोल इंजिनसह 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्स पर्याय आहेत. तर CNG मॉडेलमध्ये 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे.
हे पण वाचा :- Honda Activa 6G : संधी गमावू नका! फक्त 3,999 रुपयांमध्ये घरी आणा होंडा अॅक्टिव्हा 6G ; जाणून घ्या कसा होणार फायदा