Mhlive24
Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Electric Vehicle : इलेक्ट्रिक वाहनाना लागलेल्या आगीचे प्रकरण चिघळणार; केंद्र सरकार लक्ष घालण्याची शक्यता…

पेटोल डिझेलचे वाढते भाव आणि इलेक्ट्रिक वाहनांना आलेलं डिमांड पाहता अनेक ग्राहक इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याचा विचार करतं आहेत.

ग्राहकांचा कल लक्षात घेता कंपण्यानी देखील EV मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान आता EV वाहने पेट घेत असल्याचे निदर्शनास आले आहे.

सरकारी योजना, गुंतवणूक, लाईफस्टाईल टिप्स आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्या वाचा मोफत इथे क्लिक करून

ओला इलेक्ट्रिक, ओकिनावा ऑटोटेक आणि प्युअर ईव्हीच्या चार स्कूटरमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. यापैकी एका घटनेत, तामिळनाडूमधील ओकिनावा येथे त्यांच्या स्कूटरला आग लागल्याने वडील आणि मुलीचा मृत्यू झाला.

यापूर्वी इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्याच्या घटना घडल्यानंतर सरकार कारवाईच्या मूडमध्ये असल्याचे दिसत आहे. सरकार ओला आणि ओकिनावा इलेक्ट्रिक स्कूटर मागे घेण्यास सांगू शकते.

या प्रकरणाशी परिचित असलेल्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे.गेल्या तीन आठवड्यात ओला इलेक्ट्रिक, ओकिनावा ऑटोटेक आणि प्युअर ईव्हीच्या चार स्कूटरला आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत.

यापैकी एका घटनेत, तामिळनाडूमधील ओकिनावा येथे त्यांच्या स्कूटरला आग लागल्याने वडील आणि मुलीचा मृत्यू झाला. यामुळे इलेक्ट्रिक व्हेईकलच्या (ईव्ही) ग्राहकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

रस्ते वाहतूक मंत्रालयाने नुकतीच जाळपोळीच्या या घटनांची चौकशी सुरू केली आहे. आगीच्या या घटनांचा परिणाम केवळ कंपन्यांवरच नाही तर भारतातील इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीवरही होऊ शकतो.

यासोबतच देशातील इलेक्ट्रिक वाहने आणि बॅटरीचे हब बनण्याचे प्रयत्नही रुळावर येऊ शकतात. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे सचिव गिरीधर अरमाने सांगतात की,

गेल्या दोन महिन्यांत इलेक्ट्रिक वाहनाला लागलेल्या आगीच्या घटनेची आम्ही तज्ञांकडून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. अहवाल आल्यानंतर आम्ही आवश्यक ती कारवाई करू.