Electric Scooters: Ola S1 Pro, Ather 450X आणि Hero Vida V1 पैकी ‘ही’ आहे सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या त्यांच्या किमती
Electric Scooters: देशात इलेक्ट्रिक स्कूटर क्रेझ दिवसेंदिवस वाढतच आहे. ग्राहकांची आता इलेक्ट्रिक स्कूटरसाठी मोठ्या प्रमाणात मागणी पहिला मिळत आहे. सध्या भारतीय ऑटो मार्केटमध्ये Hero Vida V1, Ola S1 Pro आणि Ather 450X या सारख्या जबरदस्त स्कूटर राज्य करत आहे.
तुम्ही देखील यापैकी एक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असला तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. या बातमीमध्ये आम्ही तुम्हला या स्कूटरची किमतीबद्दल माहिती देणार आहोत. चला तर जाणून घ्या संपूर्ण माहिती.
सरकारी योजना, गुंतवणूक, लाईफस्टाईल टिप्स आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्या वाचा मोफत इथे क्लिक करून
Ola S1 Pro
Ola S1 Pro बहुधा इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल सर्वाधिक चर्चेत असेल. काही समजलेल्या त्रुटी असूनही, ही बाजारपेठेतील काही बेस्ट सेलर इलेक्ट्रिक स्कूटरपैकी एक आहे. Ola S1 Pro ची किंमत 1.40 लाख रुपये आहे. ही एक्स-शोरूम किंमत आहे.
Ather 450X
Ather 450X ने भारतीय इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये चांगली ओळख मिळवली आहे. स्पोर्टी लूक आणि परफॉर्मन्समुळे याने मार्केटवर पकड मिळवली आहे. अलीकडेच त्याचे अपडेटेड व्हर्जनही लाँच करण्यात आले आहे. Ather 450X ची किंमत 1.55 लाख रुपये आहे. ही एक्स-शोरूम किंमत आहे.
Hero Vida V1 Plus
Hero Vida V1 Plus हा बेस व्हेरियंट आहे आणि Hero Vida V1 Pro हा टॉप व्हेरियंट आहे. बेस व्हेरिएंट V1 Plus ची किंमत 1,45,000 रुपये आणि Vida V1 Pro ची किंमत 1,59,000 रुपये आहे. दोन्ही किंमती एक्स-शोरूम आहेत. हिरोचा दावा आहे की ही स्कूटर एका चार्जवर 165 किमी पर्यंतची रेंज देऊ शकते. त्याचे बुकिंग 10 ऑक्टोबरपासून सुरू झाले.
Hero Vida, Ola S1 Pro आणि Ather 450X च्या किमती
Hero Vida V1 Plus – रु 1,45,000
Hero Vida V1 Pro – रु 1,59,000
Ola S1 Pro- रु 1,39,999
Ather 450X – रु 1,55,657
हे पण वाचा :- Royal Enfield Himalayan इलेक्ट्रिक बाईकचे तपशील आले समोर ; जाणून घ्या ती कधी लॉन्च होणार