Electric Scooter : पेट्रोल डिझेलचे वाढते भाव आणि इलेक्ट्रिक वाहनांना आलेलं डिमांड पाहता अनेक ग्राहक इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याचा विचार करतं आहेत.
ग्राहकांचा कल लक्षात घेता कंपण्यानी देखील EV मध्ये गुंतवणुक करण्यास सुरुवात केली आहे. Tata Motors, Mahindra, MG Motors आणि Hyundai सारख्या प्रमुख कार कंपन्यांनी या विभागात त्यांची उत्पादने लाँच केली आहेत.
सरकारी योजना, गुंतवणूक, लाईफस्टाईल टिप्स आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्या वाचा मोफत इथे क्लिक करून
दरम्यान जर तुम्ही इलेक्ट्रिक टू स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. वास्तविक इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी Wroley ने एकाच वेळी तीन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर – Wroley Mars, Platina आणि Posh लॉन्च केले आहेत.
परवडणाऱ्या रेंजमध्ये येणाऱ्या या तीन इलेक्ट्रिक स्कूटर्समध्ये तुम्हाला उत्तम रेंज आणि अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. या स्कूटर्सची किंमत ₹ 66,000 पासून सुरू होते आणि तुम्हाला 90 किमी पर्यंतची रेंज ऑफर करेल.
फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर या तिन्ही स्कूटरमध्ये तुम्हाला डिजिटल डिस्प्ले, रिव्हर्स मोड, अँटी थेफ्ट अलार्म, पार्किंग मोड, अलॉय व्हील आणि डिस्क ब्रेक सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे या तिन्ही लो-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर आहेत, ज्यासाठी तुम्हाला नोंदणीची गरज नाही.
Wroley Mars किंमत आणि वैशिष्ट्ये :- या तिघांपैकी ही सर्वात स्वस्त स्कूटर आहे आणि तिची किंमत ₹66,000 एक्स-शोरूम आहे. स्कूटर एकूण 4 रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यात 40v 30amp बॅटरी आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, स्कूटर फुल चार्ज केल्यावर 75 किमी पर्यंत धावू शकते. त्याचा टॉप स्पीड 25 किलोमीटर प्रति तास इतका आहे.
Wroley Platina किंमत आणि वैशिष्ट्ये :- दुसऱ्या मॉडेलची एक्स-शोरूम किंमत रु.73,700 आहे. स्कूटर एकूण 6 रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यात 60v 30amp बॅटरी आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, स्कूटर पूर्ण चार्ज केल्यावर 90 किमी पर्यंत धावू शकते. त्याचा टॉप स्पीड 25 किलोमीटर प्रति तास इतका आहे.
Wroley पॉश किंमत आणि वैशिष्ट्ये :- ही कंपनीची प्रीमियम स्कूटर आहे ज्याची किंमत 78,100 रुपये एक्स-शोरूम आहे. स्कूटरचा लूक मोठ्या प्रमाणात व्हेस्पाची आठवण करून देणारा आहे.
स्कूटर एकूण 6 रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यात 60v 30amp बॅटरी आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, स्कूटर पूर्ण चार्ज केल्यावर 90 किमी पर्यंत धावू शकते. त्याचा टॉप स्पीड 25 किलोमीटर प्रति तास इतका आहे.