Discount Offers : 10 लाखांच्या आत घरी आणा ‘ह्या’ जबरदस्त कार्स ; होणार हजारोंची बचत, जाणून घ्या कसा होणार लाभ

Discount Offers : भारतीय ऑटो मार्केटमध्ये पुन्हा एकदा अनेक कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन नवीन ऑफर जाहीर करत आहेत. तुम्ही देखील या महिन्यात कार खरेदी करणार असला तर आज आम्ही तुम्हला मार्केटमध्ये सध्या उपलब्ध असणाऱ्या ऑफर्सबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत . 

या ऑफरचा लाभ घेऊन तुम्ही फक्त 10 लाखांच्या आत नवीन कार खरेदी करू शकतात. चला तर जाणून घ्या या भन्नाट ऑफरबद्दल सर्वकाही.

Maruti S-Presso

या महिन्यात मारुती एस-क्रॉसवरही डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहेत. यामध्ये 49,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर्स दिल्या जात आहेत. यामध्ये 30,000 रुपयांची रोख सवलत, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे.

Maruti Celerio

मारुतीच्या सेलेरियोच्या खरेदीवर तुम्हाला एकूण 44,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. यामध्ये 25,000 रुपयांची रोख सवलत, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट मिळत आहे. तर त्याचे ऑटोमॅटिक व्हेरिएंट फक्त 19,000 रुपयांच्या रोख सवलतीसह येते.

Hyundai Grand i10 Nios

Hyundai Grand i10 Nios, जी 10 लाख रुपयांच्या रेंजमध्ये येते, त्यावर 48,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. 10,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट देखील आहे. तसेच, Hyundai 1.0-लीटर टर्बो व्हेरियंटवर रु. 35,000 पर्यंत, CNG व्हेरियंटवर रु. 25,000 आणि 1.2-लीटर पेट्रोल व्हेरियंटवर रु. 15,000 पर्यंत रोख सूट देत आहे.

Honda WR-V

जर तुम्ही Honda WR-V कार घेण्याचा विचार करत असाल तर ही सर्वोत्तम संधी आहे. नोव्हेंबर महिन्यात या Honda कारच्या खरेदीवर तुम्ही कमाल 63,144 रुपये वाचवू शकता. यामध्ये मोफत अॅक्सेसरीजसाठी 30,000 रुपये किंवा 36,144 रुपयांची कॅश डिस्काउंट दिली जात आहे. एक्सचेंज बोनसवर 10,000 रुपये, लॉयल्टी बोनससाठी 5,000 रुपये आणि एक्सचेंजवर 7,000 रुपये दिले जात आहेत. याशिवाय यामध्ये 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूटही उपलब्ध आहे.

हे पण वाचा :-  Upcoming Cars :  कार खरेदी करण्याचा विचार करत आहात? तर आठवडाभरात मार्केटमध्ये दमदार एंट्री करणार ‘ह्या’ जबरदस्त कार्स ; पहा लिस्ट