Special tips to increase bike tyres life : ह्या टिप्स अवलंबून वाढवा गाडीच्या टायरचे आयुष्य – वाचा सविस्तर
Special tips to increase bike tyres life : भारत ही ऑटो सेक्टरची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. येथे दररोज अनेक उलाढाली होत असतात. अशातच वाहनाच्या सर्व प्रकारच्या साधनांचे भारतीय बाजारपेठ क्षेत्र बनले आहे.
वास्तविक टायर हा बाईकचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे . बाईक असो की कार, तो सर्वात जास्त महत्त्वाचा भाग मानला जातो, टायरशिवाय बाइक,कार किंवा कोणत्याही वाहनाची कल्पना करणे कठीण आहे.
सरकारी योजना, गुंतवणूक, लाईफस्टाईल टिप्स आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्या वाचा मोफत इथे क्लिक करून
अशा स्थितीत टायर नेहमी जमिनीच्या संपर्कात येत असतात.अशा स्थितीत सपाट रस्त्यांसह खडबडीत रस्त्यांचा देखिल त्यांना सामना करावा लागतो, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत टायरचे आयुष्य कसे वाढवायचे.
हवेचा दाब तुमच्या बाईकच्या टायरमध्ये हवेच्या दाबाची योग्य पातळी नेहमी ठेवा, यासोबतच एका बाईकच्या टायरचा हवेचा दाब दुसर्या बाईकपेक्षा वेगळा असू शकतो, तुम्ही ज्या कंपनीची बाईक घ्याल, त्यावर मॅन्युअल छापलेले असते, म्हणूनच सोबत टायरमध्ये योग्य दाब ठेवून, मॅन्युअल देखील तपासा.
स्पीड आणि ब्रेक्सचा हुशारीने वापर करा, तुम्ही बाईक चालवत आहात, तेव्हा तुम्ही वेगाची काळजी घेतली पाहिजे, अशा परिस्थितीत तुमच्या सुरक्षेसाठी हे सर्वात महत्वाचे आहे, बाईकचा वेग अचानक कमी करू नका आणि अचानक वाढवू नका. ब्रेकमुळे तुमच्या टायरचे रबर घासले जाते.
शेडमध्ये पार्किंग करा उन्हाळ्यात तापमान ज्या प्रकारे दिवसेंदिवस वाढत आहे, उष्णता शिगेला पोहोचत आहे, त्यामुळे नेहमी तुमचे वाहन उन्हात पार्क न करण्याचा प्रयत्न करा, ते शेड किंवा पार्कसारख्या ठिकाणी पार्क करा, यामुळे बाईकचा टायर जास्त काळ टिकतो, म्हणून मग बाइक नेहमी सावलीच्या ठिकाणी ठेवा.
व्हील अलाइनमेंट तुम्ही नेहमी तुमच्या चाकांचे अलाइनमेंट वेळोवेळी तपासले पाहिजे, यासाठी मॅन्युअल दिलेले आहे. चुकीचे अलाइनमेंट टायरचे आयुष्य कमी करू शकते.