Cheap 7 Seater Car : खुशखबर ! आता ‘ही’ कंपनी आणणार स्वस्त 7 सीटर कार; किंमत असणार फक्त ..

Cheap 7 Seater Car : तुम्ही देखील बजेटमध्ये 7 Seater Car खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो 7 Seater Car सेगमेंटमध्ये लवकरच एक मोठा धमाका होणार आहे.

Citroën आपले नवीन 7 Seater Car भारतात आणण्यासाठी पूर्ण तयारी करत आहे. रिपोर्ट्सनुसार, नवीन मॉडेल कंपनीच्या विद्यमान C3 हॅचबॅकच्या प्लॅटफॉर्मवर तयार केले जाईल. Citroen C3 Aircross ची विक्री 2023 मध्ये सुरू होऊ शकते. याची किंमत 6 ते 7 लाख रुपयांमध्ये येऊ शकते असे मानले जाते.

Citroen C3 Aircross चे सांकेतिक नाव CC24 देण्यात आले आहे. हे मॉडेल टेस्टिंग दरम्यान अनेक वेळा स्पॉट केले गेले आहे. इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, नवीन Citroen 7-सीटर SUV मध्ये 1.2-लीटर 3-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन दिले जाईल जे 110bhp पॉवर आणि 190Nm टॉर्क निर्माण करेल.

याशिवाय 1.2 लीटर 3-सिलेंडर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनचा पर्याय यामध्ये मिळू शकतो. जे 82bhp पॉवर आणि 115Nm टॉर्क जनरेट करते. हे दोन्ही इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येऊ शकतात डिझाइन नवीन Citroen C3 एअरक्रॉसच्या डिझाईनमध्ये नवीनता दिसून येते, परंतु सध्याच्या Citroen C3 हॅचबॅकची झलकही यामध्ये पाहायला मिळते.

यामध्ये 16 आणि 17 इंच टायर वापरता येतील. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर C3 मध्ये 10-इंच फ्री-स्टँडिंग टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम मिळू शकते. सुरक्षेसाठी, यात एअरबॅग्ज आणि अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम सारखी फीचर्स मिळू शकतात.

हे पण वाचा :- Maruti Omni EV : मारुती ओम्नी इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये प्रवेश करणार ?;अनेक चर्चांना उधाण, जाणून घ्या नेमकं प्रकरण