Tata Cars Price Hike: ग्राहकांना धक्का ! टाटाने 30000 रुपयांनी महाग केली ‘ही’ कार ; आता खरेदीसाठी मोजावे लागणार ‘इतके’ पैसे

Tata Cars Price Hike: अनेकांच्या मनावर राज्य करणारी कंपनी टाटाने ग्राहकांना जोरदार धक्का दिला आहे. टाटाने आपल्या टॉप्स कार्स महाग केले आहे. टाटाने टियागो, टिगोर, अल्ट्रोज, पंच, नेक्सॉन आणि सफारीच्या किमतीमध्ये वाढ केली आहे तसेच टाटा हॅरियरच्या किंमतीत देखील सर्वात मोठी वाढ करण्यात आली आहे.

कंपनीने किमतींमध्ये 30,000 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. टियागोची किंमत आठ हजार रुपयांनी वाढली आहे. या वाहनाच्या XZ+ व्हेरियंटची किंमत सर्वाधिक वाढली आहे. Tiago ची भारतात किंमत 5.45 लाख ते 7.90 लाख रुपये आहे. त्याचवेळी टिगोरच्या किमतीत 10,000 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे त्याच्या बेस व्हेरियंटची किंमत वाढली आहे.

बाकीचे व्हेरियंट केवळ 6,000 रुपयांनी महागले आहेत. त्याची किंमत 6.10 लाख ते 8.84 लाख रुपये आहे. Altroz ​​ची किंमत देखील 10,000 रुपयांनी वाढली आहे. XM, XT आणि XZ च्या मिड-व्हेरियंटच्या किमतीत सर्वाधिक 10,000 रुपयांनी वाढ झाली आहे, तर XE या बेस व्हेरिएंटची किंमत 5,000 रुपयांनी वाढली आहे. त्याच्या XZ+ डार्क एडिशन व्हेरिएंटच्या किमती बदललेल्या नाहीत.

या कारची किंमत 6.35 लाख ते 10.25 लाख रुपये आहे. याशिवाय पंचाच्या किमतीत सात हजार रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. मात्र, कॅमो एडिशनच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

या कारची किंमत 6 लाख ते 9.54 लाख रुपयांपर्यंत आहे. Nexon ची किंमत 18,000 रुपयांपर्यंत वाढली आहे. XZ+ (P) व्हेरियंटवर 18,000 रुपयांची कमाल वाढ करण्यात आली आहे. त्याच्या स्पेशल एडिशनही महाग झाल्या आहेत.

Tata Nexon ची भारतात किंमत 7.70 लाख ते 12.88 लाख रुपये आहे. त्याचवेळी हॅरियरच्या किमतीत सर्वाधिक 30,000 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. त्याच्या XZ+ व्हेरिएंटची किंमत सर्वाधिक वाढली आहे.

हॅरियरची किंमत आता 14.8 लाख ते 22.25 लाख रुपये आहे. टाटा सफारीच्या किमतीतही वाढ झाली आहे. त्याची किंमत 20,000 रुपयांनी वाढली आहे. आता ते 15.45 लाख ते 23.76 लाख रुपयांच्या दरम्यान येईल.

हे पण वाचा :- Porsche 911 Dakar: प्रतीक्षा संपली ! या दिवशी पोर्शची नवीन कार करणार मार्केटमध्ये एंट्री ; वाचा सविस्तर