Cars Price Hike News : नवीन वर्षात ‘ह्या’ कंपन्यांच्या कार्स होणार महाग ! लिस्ट पाहून व्हाल तुम्ही थक्क

Cars Price Hike News :  येणाऱ्या काही दिवसातच आपण नवीन वर्षात एन्ट्री करणार आहे मात्र या नवीन वर्षात पहिल्याच दिवशी ग्राहकांच्या खिश्यावर परिणाम होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो देशात जर तुम्ही नवीन वर्षात कार खरेदीचा विचार करत असाल तर तुम्हाला कार खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे.

देशातील बहुतेक कंपन्यांनी आपल्या कार्सच्या किमतीमध्ये वाढ केली आहे. या लिस्टमध्ये  मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, किया इंडिया, रेनॉल्ट, सिट्रोएन, जीप, ऑडी, मर्सिडीज-बेंझ सारख्या कंपन्या आहे जे नवीन वर्षात आपल्या कार्सच्या किमतीमध्ये वाढ करणार आहे.

Tata कार खरेदी करणे महाग होणार  

टाटा जानेवारी 2023 पासून ICE कार आणि EV च्या किमती वाढवणार आहे. कंपनीने सांगितले की, किमती वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे वस्तूंच्या चढ्या किमती. टाटाने आगामी आरडीई नियमांचे पालन करण्याच्या किंमतीबद्दल देखील बोलले आहे.

Nexon EV, Tiago EV आणि Tigor EV सारख्या EV च्या बाबतीत, बॅटरी वाढल्यामुळे किंमती वाढतील. बर्‍याच कंपन्या आता झपाट्याने इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत, त्यामुळे बॅटरीच्या किमतीत सातत्याने वाढ होणार आहे.

Hyundai  कार घेणे महाग होणार  

आता जानेवारी 2023 पासून वाढणाऱ्या किमतींच्या यादीत Hyundai Motor India Limited (HMIL) चे नाव देखील समाविष्ट करण्यात आले आहे. पीटीआयच्या बातमीनुसार, वाढत्या इनपुट कॉस्टमुळे Hyundai पुढील महिन्यात आपल्या कारच्या किमती वाढवणार आहे.

मात्र, कंपनी किती रुपयांनी किंवा टक्केवारीने वाढणार, याबाबत अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही. तथापि, वाढलेल्या किमतींचा ग्राहकांवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी आपले अंतर्गत प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचे एचएमआयएलने म्हटले आहे.

Maruti कार घेणे महागणार आहे

मारुतीने जानेवारी 2023 पासून आपल्या कार खरेदी करणे महाग होणार असल्याचे जाहीर केले आहे. कंपनी वेगवेगळ्या मॉडेल्सनुसार किंमती वाढवणार आहे. कंपनीने आपल्या अधिकृत नोटमध्ये म्हटले आहे की कमोडिटीने आम्हाला किंमती वाढवण्यास भाग पाडले आहे. मारुतीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारमध्ये Alto, Alto K10, Ignis, WagonR, Celerio, S-Presso, Swift, Eeco, Dzire, Brezza, Ciaz, Ertiga, XL6 आणि Grand Vitara. यांचा समावेश आहे.

Kia कार खरेदी करणे महाग  

Kia ने सांगितले आहे की ते 1 जानेवारी 2023 पासून त्यांच्या कारच्या किमतीत 50,000 रुपयांपर्यंत वाढ करणार आहेत. तथापि, कंपनी सेल्टोस, सॉनेट, केरेन्स आणि कार्निव्हलच्या विविध व्हेरियंटवर वेगवेगळी दरवाढ देईल. Kia India ने भारतीय बाजारपेठेत एक नवा मैलाचा दगड रचला आहे. कंपनीने नोव्हेंबरमध्ये 6 लाख युनिट्सची विक्री करण्याचा चमत्कारिक आकडा पार केला आहे

हे पण वाचा :- Car Price Hike: ग्राहकांना धक्का ! ‘या’ कार्सच्या किमतीमध्ये वाढ; खरेदीसाठी मोजावे लागणार आता ‘इतके’ पैसे