Car Price: तुम्ही देखील नवीन वर्षात नवीन कार खरेदीचा विचार करत असला तर तुमच्यासाठी एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. तुम्हाला आता नवीन वर्षात कार खरेदी करताना डबल आर्थिक फटका बसणार आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो नवीन वर्षातकार खरेदी करणे दुप्पट महाग होणार आहे. या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला ही माहिती देत आहोत.
डबल फटका
एकीकडे कार कंपन्यांकडून कारच्या किमती वाढवण्याच्या घोषणा केल्या जात आहेत. दुसरीकडे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अलीकडेच कार कर्ज महाग करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर नवीन वर्षात नवीन गाड्या खरेदी करणाऱ्यांवर दुहेरी चपराक बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कार कर्ज महाग होईल
बुधवारीच रिझर्व्ह बँकेची बैठक झाली. या बैठकीनंतर आरबीआयकडून रेपो दरात 35 बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. ज्यानंतर कार लोन महाग होणार हे स्पष्ट झाले. त्यानंतर, नवीन कार खरेदी करताना, तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त ईएमआय द्यावा लागेल.
कार कंपन्यांची घोषणा
कार कंपन्या नवीन वर्षाच्या आधीच कारच्या किमती वाढवण्याची घोषणा करत आहेत. मारुती, किया, मर्सिडीज, ऑडी, रेनॉल्ट, एमजी, टाटा यांसारख्या कंपन्यांकडून सांगण्यात आले आहे की 1 जानेवारी 2023 पासून कार खरेदीसाठी जास्त किंमत मोजावी लागणार आहे.
किमती का वाढत आहेत
कच्च्या मालाच्या किमतीसह विविध कारणांमुळे नवीन वर्षात कारच्या किमतीत वाढ करण्यात येत असल्याचे सर्वच कार कंपन्यांचे म्हणणे आहे. वाढलेली किंमत जास्त काळ सहन करणे कंपन्यांना शक्य नसल्याने नवीन वर्षापासून गाड्यांच्या किमतीत वाढ करण्यात येणार असल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे.
हे पण वाचा :- Hyundai Cars Offers : भन्नाट ऑफर ! ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करा ‘ह्या’ दमदार कार्स ; मिळत आहे 1.50 लाखांपर्यंत सूट