Car Discount Offer: कार खरेदीची सुवर्णसंधी ! ह्या कार्सवर बंपर सूट ; होणार हजारोंची बचत

Car Discount Offer:  या महिन्यात तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असेल तर आम्ही तुम्हाला आज अश्या ऑफर्सबद्दल माहिती देणार आहोत ज्यामुळे तुमचे हजारो रुपयांची बचत होऊ शकते.

तुमच्या माहितीतीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो कि या महिन्यात होंडा कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या टॉप कार्सवर जबरदस्त डिस्काउंट ऑफर जाहीर केला आहे. या ऑफरमुळे होंडा ग्राहकांचे हजारो रुपयांची बचत होणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त 63,144 रुपयांची बचत केली जाऊ शकते. होंडाने Honda City 5th Gen, Jazz, WR-V आणि Amaze सारख्या कार्सवर सवलत जाहीर केली आहे.

Honda WR-V 

गेल्या महिन्याप्रमाणे यावेळीही Honda WR-V कारवर सर्वाधिक सवलत उपलब्ध आहे. तुम्ही त्याच्या खरेदीवर जास्तीत जास्त 63 144 रुपये वाचवू शकता. यामध्ये मोफत अॅक्सेसरीजसाठी 30,000 रुपये किंवा 36,144 रुपयांची कॅश डिस्काउंट दिली जात आहे. एक्सचेंज बोनसवर 10,000 रुपये, लॉयल्टी बोनससाठी 5,000 रुपये आणि एक्सचेंजवर 7,000 रुपये. याशिवाय, यावर 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देखील मिळते.

Honda Amaze

नोव्हेंबरमध्ये Honda Amaze कारच्या खरेदीवर तुम्हाला एकूण 19,896 रुपये वाचवण्याची संधी मिळेल. 10,000 रुपयांची रोख सवलत किंवा 11,896 रुपयांची ऍक्सेसरी सूट, 5,000 रुपयांचा ग्राहक लॉयल्टी बोनस आणि 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट आहे. Honda Amaze 1.2-लीटर पेट्रोल इंजिन आणि 1.2-लीटर पेट्रोल इंजिनसह येते.

Honda City 4th Generation

होंडा आपल्या लोकप्रिय सेडान कार सिटीच्या  4th Generation च्या मॉडेलवर सवलत देत आहे. यामध्ये कमाल 5,000 रुपयांची सूट दिली जात आहे, जी लॉयल्टी बोनसच्या रूपात उपलब्ध आहे.

Honda City 5th Generation

होंडा सिटीच्या 5th Generation च्या कारमध्ये नोव्हेंबरमध्ये जास्तीत जास्त 59,292 रुपयांची बचत होऊ शकते. यामध्ये 30,000 रुपयांपर्यंत रोख सवलत किंवा 32,292 रुपयांची FOC अॅक्सेसरीज दिली जात आहेत. याशिवाय, लॉयल्टी बोनसवर 5,000 रुपयांपर्यंत आणि कार एक्सचेंजवर 10,000 रुपयांपर्यंत सूट आहे. कॉर्पोरेट डिस्काउंटसाठी 5,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. या महिन्यात Honda City खरेदीवर 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देखील आहे.

Honda Jazz

या महिन्यात Honda Jazz विकत घेतल्यावर जास्तीत जास्त 25,000 रुपयांची बचत होऊ शकते. यामध्ये कॉर्पोरेट डिस्काउंट म्हणून 3,000 रुपयांची सूट दिली जात आहे. तसेच, 10,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज सूट, 5,000 रुपयांपर्यंतचा ग्राहक लॉयल्टी बोनस आणि एक्सचेंज ऑफरवर 7,000 रुपयांपर्यंत सूट आहे.

हे पण वाचा :-  Maruti Suzuki Cars :  मारुती सुझुकीच्या विक्रीत ‘या’ 15 कार्स चमकल्या! पहा संपूर्ण लिस्ट