Car Discount Offer: 50 हजारांच्या सवलतीत घरी आणा सर्वाधिक विकली जाणारी कार ; जाणून घ्या कसा होणार फायदा

Car Discount Offer: पुन्हा एकदा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी देशातील सर्वात मोठी कंपनी पैकी एक असणारी मारुती सुझुकीने भन्नाट ऑफर जाहीर केला आहे. या ऑफरचा लाभ घेऊन तुम्ही कमी किमतींमध्ये नवीन कार खरेदी करू शकतात. चला तर जाणून घ्या या ऑफरबद्दल संपूर्ण माहिती.

मारुती सुझुकीच्या कार्सवर 50 हजारांपर्यंत सूट देऊन खरेदी करता येतील. येथे आम्ही तुम्हाला मारुतीच्या त्या दोन कार्सबद्दल सांगत आहोत, ज्यावर सर्वाधिक सूट मिळणार आहे. विशेष म्हणजे यात ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक विक्री झालेल्या कारचाही समावेश आहे.

50 हजार सवलतीत सर्वाधिक विक्री होणारी कार ऑक्टोबर महिन्यात मारुती अल्टो ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. गेल्या महिन्यात या वाहनाच्या 21,260 युनिट्सची विक्री झाली आहे.

मारुती अल्टो दोन व्हेरियंटमध्ये येते – Alto 800 आणि Alto K10. नोव्हेंबरमध्ये कंपनी Alto K10 वर 50,000 रुपयांची सूट देत आहे. Maruti Suzuki Alto K10 किंमत 4.59 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. नोव्हेंबरमध्ये तुम्ही ही कार आणखी स्वस्तात खरेदी करू शकता. या वाहनावर 30,000 रुपयांची रोख सूट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे.

एवढेच नाही तर मारुती सुझुकी आपल्या S-Presso कारवर 50 हजार रुपयांची सूटही देत ​​आहे. या डिस्काउंटमध्ये 30 हजार रुपयांची कॅश डिस्काउंट दिली जात आहे. याशिवाय, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5 हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट समाविष्ट आहे. या वाहनाची किंमत 4.88 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.

हे पण वाचा :- Cars Offers : सुवर्णसंधी ! फक्त 57 हजारमध्ये बलेनो आणि 70 हजार रुपयांमध्ये खरेदी करा मारुती स्विफ्ट ; जाणून घ्या कसं