Mhlive24
Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Business Idea : नोकरी करता-करता सुरु करा हे व्यवसाय; कमी गुंतवणुकीत मिळवाल लाखोंचा फायदा

MHLive24 टीम, 03 एप्रिल 2022 :- Business Idea : तुम्ही जर एखादा चांगला व्यवसाय शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही नवीन गोष्टी आणल्या आहेत. आम्ही आज तुम्हाला अशी बिझनेस आयडिया देत आहोत, ज्यातून तूम्ही भरपूर कमाई करू शकता. आज आपण अशा बिझनेसबद्दल जाणून घेणार आहोत, जो तुम्ही नोकरी करता- करता करु शकता.

हे खडू, बिंदी, लिफाफा, मेणबत्ती बनवण्याचे व्यवसाय आहेत, ज्याचे ऑनलाइन किंवा ऑफलाइन मार्केटिंग केले जाऊ शकते आणि भरपूर नफा मिळवता येतो.

सरकारी योजना, गुंतवणूक, लाईफस्टाईल टिप्स आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्या वाचा मोफत इथे क्लिक करून

हे साईड बिझनेस आहेत

खडू बनवण्याचा व्यवसाय

खडू बनवणे हा एक व्यवसाय आहे ज्यासाठी खूप कमी गुंतवणूक करावी लागते. तुम्ही घरबसल्या सहज सुरू करू शकता. सर्व शाळा, महाविद्यालयात खडू आवश्यक असतो हे आपणा सर्वांना माहीत आहे. खडू तयार करण्यासाठी जास्त साहित्य आवश्यक नाही.

तुम्ही फक्त 10,000 रुपयांपासून ते सुरू करू शकता. यामध्ये पांढऱ्या खडूने रंगीत खडूही बनवता येतो. आम्ही तुम्हाला सांगतो की खडू मुख्यतः प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवले जातात. ही पांढर्‍या रंगाची पावडर आहे. ही एक प्रकारची चिकणमाती आहे जी जिप्सम नावाच्या दगडापासून तयार केली जाते.

बिंदी बनवण्याचा व्यवसाय

सध्या बाजारात बिंदीची मागणी खूप वाढली आहे. पूर्वी केवळ विवाहित महिलाच बिंदी लावत असत, मात्र आता मुलींनी बिंदी लावण्याचा ट्रेंड सुरू केला आहे. इतकंच नाही तर परदेशातील महिलाही बिंदी घालू लागल्या आहेत. अशा स्थितीत त्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. फक्त 12,000 रुपये गुंतवून घरात बसून बिंदी बनवण्याचा व्यवसाय सुरू करता येतो.

लिफाफा बनवण्याचा व्यवसाय

लिफाफे बनवणे हा अतिशय सोपा आणि स्वस्त व्यवसाय आहे. हे कागद किंवा कार्ड बोर्ड इत्यादीपासून बनवलेले उत्पादन आहे. हे मुख्यतः पॅकेजिंगसाठी वापरले जाते. ज्याचा उपयोग कागदपत्रे, ग्रीटिंग कार्ड इत्यादी गोष्टींच्या पॅकेजिंगसाठी केला जातो. हा सदाबहार व्यवसाय आहे.

म्हणजेच या व्यवसायात दर महिन्याला कमाई असेल. जर तुम्ही घरातून हा व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला 10,000 ते 30,000 रुपये गुंतवावे लागतील आणि जर तुम्ही मशीन लावून लिफाफे बनवले तर त्यासाठी तुम्हाला 2,00,000 ते 5,00,000 रुपये गुंतवावे लागतील.

मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय

काळानुरूप या व्यवसायात बरेच बदल झाले आहेत. पूर्वी दिवे गेल्यावर मेणबत्त्या वापरल्या जात होत्या, आता वाढदिवस, घरे, हॉटेल्स सजवण्यासाठी त्याचा वापर वाढला आहे. अशा परिस्थितीत मेणबत्त्यांची मागणी खूप वाढली आहे. जर तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही 10,000 ते 20,000 रुपयांची गुंतवणूक घरी बसून करू शकता.

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit