बहुतांश वेळा नोकरी करणे अनेकांना त्रासदायक ठरत. अनेकजण अशावेळी विविध संधींचा शोध घेत असतात. विविध व्यवसाय संधी शोधताना त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा देखील अनेकजण विचार करतात.
तर आज आम्ही तुम्हाला अशी बिझनेस आयडिया देत आहोत, जी तुमच्या फायद्याची ठरू शकेल. यानुसार तुम्ही पेपर नॅपकिन्सच्या व्यवसायात हात आजमावू शकता.
सरकारी योजना, गुंतवणूक, लाईफस्टाईल टिप्स आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्या वाचा मोफत इथे क्लिक करून
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारही मदत करत आहे. पेपर नॅपकिन्स बनवण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग युनिट सेट करून तुम्ही बंपर कमवू शकता.
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी किती खर्च येतो आणि तुम्ही किती कमाई करू शकता हे आपण जाणून घेऊया. आजच्या बदलत्या जीवनशैलीत टिश्यू पेपर म्हणजेच नॅपकिनचा वापर अधिक होऊ लागला आहे.
सहसा हात आणि तोंड स्वच्छ करण्यासाठी टिश्यू पेपरचा वापर केला जातो. आजकाल ते रेस्टॉरंट, हॉटेल, ढाबा, ऑफिस, हॉस्पिटल अशा जवळपास सर्वत्र वापरले जाते.
किती गुंतवणूक करायची ? जर तुम्हाला पेपर नॅपकिन म्हणजेच टिश्यू पेपरचे उत्पादन युनिट उभारायचे असेल तर तुम्हाला सुमारे 3.50 लाख रुपयांची व्यवस्था करावी लागेल. इतके पैसे मिळाल्यानंतर तुम्ही मुद्रा योजनेअंतर्गत कर्जासाठी कोणत्याही बँकेत अर्ज करू शकता.
तुमच्याकडे 3.50 लाख रुपये असल्यामुळे, तुम्हाला बँकेकडून सुमारे 3.10 लाख रुपये मुदत कर्ज आणि 5.30 लाखांपर्यंतचे खेळते भांडवल कर्ज मिळेल.
एका वर्षात 1.50 लाख किलो पेपर नॅपकिन्स तयार होऊ शकतात. सुमारे 65 रुपये प्रति किलो दराने त्याची विक्री होऊ शकते. म्हणजेच तुम्ही एका वर्षात सुमारे 97.50 लाख रुपयांची उलाढाल करू शकता. यातील सर्व खर्च काढून टाकल्यास वर्षाला सुमारे 10-12 लाख रुपयांची बचत होऊ शकते.
मुद्रा योजनेअंतर्गत अर्ज करा यासाठी तुम्ही प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कोणत्याही बँकेत अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल, ज्यामध्ये हे तपशील द्यावे लागतील. नाव, पत्ता, व्यवसाय पत्ता, शिक्षण, वर्तमान उत्पन्न आणि किती कर्ज आवश्यक आहे. यामध्ये कोणतीही प्रक्रिया शुल्क किंवा हमी शुल्क भरावे लागणार नाही. कर्जाची रक्कम सुलभ हप्त्यांमध्ये परत केली जाऊ शकते.