Auto Expo 2023 मध्ये दिसणार ‘ह्या’ दमदार कार्स ; पहा संपूर्ण लिस्ट व्हाल तुम्ही थक्क!

Auto Expo 2023 : नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात 13-18 जानेवारी दरम्यान ग्रेटर नोएडामध्ये Auto Expo 2023 पार पडणार आहे. यामध्ये अनेक कंपन्या सहभागी होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो.

या Auto Expo 2023 मध्ये Maruti Suzuki, Hyundai Motor, Toyota, Kia, MG, BYD आणि Tata Motors आपल्या दमदार कार्स सादर करणार आहे. चला तर जाणून घ्या यावेळी  Auto Expo 2023 कोण कोणत्या कार्स दिसणार होणार आहे.

Hyundai

Hyundai ऑटो एक्स्पो 2023 मध्ये त्‍याच्‍या new Creta facelift आणि new generation Verna देखील अनावरण करेल. याशिवाय कंपनी Hyundai Ai3 (मिनी SUV) हे कोडनेम देखील सादर करणार आहे. याशिवाय अपडेटेड Hyundai Grand i10 Nios देखील दाखवता येईल.

Toyota

टोयोटा ऑटो एक्स्पोमध्ये Innova Hycross चे प्रदर्शन करेल आणि त्याची किंमत देखील जाहीर केली जाईल. हा 3rd Row MPV आहे जो 2.0 लिटर पेट्रोल इंजिन आणि हायब्रिड तंत्रज्ञान पर्यायासह येईल. नवीन मॉडेलमध्ये ADAS (Advanced Driver Assistance System) फीचर्सचा समावेश करण्यात येणार आहे.

Tata Motors

Tata Motors पुढील महिन्यात होणाऱ्या ऑटो एक्सपोमध्ये Tiago EV, Altroz EV आणि Punch EV सोबत टाटा हॅरियर आणि सफारी फेसलिफ्ट्सचे अनावरण करू शकते. यावेळी टाटाच्या नवीन मॉडेलमध्ये ADAS (Advanced Driver Assistance System) फीचर्सचा समावेश करण्यात येणार आहे.

Maruti Suzuki

ऑटो एक्स्पो 2023 मध्ये, देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी नवीन सी-सेगमेंट MPV आपल्या नवीन Baleno Cross आणि 5 Door Jimny सह सादर करेल. यापैकी जिमनीबाबत बाजार चांगलाच तापला आहे. इतकेच नाही तर ज्यांना SUV+कारचा आनंद घ्यायचा आहे त्यांच्यासाठी बलेनो क्रॉस आणले जाईल.

हे पण वाचा :-  Car Discount Offers: ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करा ‘ह्या’ कार्स ! होणार 72340 रुपयांची बचत ; जाणून घ्या कसा होणार फायदा