हेडलाईन्सAuto Expo 2023 : ठरलं ! ऑटो एक्सपो 2023 मध्ये मारुती सादर...

Auto Expo 2023 : ठरलं ! ऑटो एक्सपो 2023 मध्ये मारुती सादर करणार ‘ह्या’ 5 पावरफुल कार्स ; लिस्ट पाहून व्हाल तुम्ही थक्क

Related

Share

Auto Expo 2023 :    देशातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय कंपनी मारुती सुझुकी 2023 ऑटो एक्सपोमध्ये मध्ये मोठा धमाका करण्याच्या तयारीमध्ये आहे . समोर आलेल्या माहितीनुसार कंपनी 2023 ऑटो एक्सपोमध्ये आपले 5 पावरफुल कार्स सादर करणार आहे.

- Advertisement -

ह्या 5 पावरफुल कार्सची माहिती सध्या समोर आली आहे जे आम्ही तुम्हाला या बातमी मध्ये देणार आहोत. मिळालेल्या माहितीनुसार जिमनी 5 डोअर ते बलेनो क्रॉस सारख्या कार्स मारुती 2023 ऑटो एक्सपोमध्येसादर करणार आहे.

- Advertisement -सरकारी योजना, पैसा आणि शेती व आरोग्य विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

 Maruti Suzuki Electric Car Concept

भारतात इलेक्ट्रिक कारची वाढती मागणी पाहता मारुती सुझुकी देखील इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये प्रवेश करणार आहे. कंपनी इलेक्ट्रिक ड्राईव्ह ट्रेनची टेस्टिंग करत आहे. इलेक्ट्रिक कारची संकल्पना मारुती सुझुकी 2023 ऑटो एक्सपोमध्ये सादर करू शकते.

Maruti Suzuki Swift Sport

मारुती सुझुकी ऑटो एक्सपो 2023 मध्ये स्विफ्ट स्पोर्टचे अनावरण देखील करेल. सध्याच्या स्विफ्टपेक्षा ते अधिक स्पोर्टी असेल आणि त्यात अनेक डिझाइन घटक दिसू शकतात. अहवालानुसार, टेस्टिंग मॉडेल भारतीय रस्त्यांवर ARAI वाहनांसह  टेस्टिंग करताना दिसले.

Maruti Suzuki Baleno Cross

सध्या देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार मारुती बलेनो आहे आणि आता कंपनी बलेनो क्रॉस लाँच करण्याच्या तयारीत आहे.कंपनी ऑटो एक्सपो 2023 मध्ये या कारचे अनावरण करणार आहे. बलेनो क्रॉसचे डिझाईन बोल्ड आणि स्टायलिश असेल आणि त्यामुळे साइड क्लॅडिंग आणि स्किड प्लेट्स यामध्ये दिसू शकतात.

Maruti Suzuki Jimny 5-door

मारुती सुझुकी आपल्या नवीन जिमनी 5-डोअरसह येत आहे.  कंपनी हे वाहन ऑटो एक्सपो 2023 मध्ये सादर करेल. यात 1.5 लिटर पेट्रोल इंजिनसह ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल गिअरबॉक्सचा पर्याय मिळेल. ऑन रोड सोबतच ते ऑफ रोडवर देखील चांगली कामगिरी करेल.

New Maruti MPV

Ertiga आणि XL6 नंतर, आता मारुती सुझुकी आपल्या नवीन MPV वर काम करत आहे आणि हे नवीन मॉडेल आगामी ऑटो एक्सपोमध्ये सादर केले जाईल. सिंगल डिझाईन टोयोटा इनोव्हा हायक्रॉस सारखे असू शकते. रिपोर्ट्सनुसार, नवीन मॉडेल टेस्टिंग दरम्यान स्पॉट झाले आहे. भारतात हे 20 ते 21 लाख रुपयांमध्ये लॉन्च केले जाऊ शकते.

हे पण वाचा :-  Year Ender 2022: ‘ह्या’ ऑटो कंपनीने 2022 मध्ये सर्वाधिक कार्स विकले ; जाणून घ्या टॉप-5 कोणी मारली बाजी