हेडलाईन्स7 Seater Car : घरी आणा मारुतीची 'ही' स्वस्त 7 सीटर कार...

7 Seater Car : घरी आणा मारुतीची ‘ही’ स्वस्त 7 सीटर कार ! मिळणार 27 किमी मायलेज ; किंमत फक्त 5.10 लाखांपासून सुरू

Related

Jaggery Side Effects: फायदे समजून तुम्ही करत असाल गुळाचे सेवन तर सावधान नाहीतर होणार ..

Jaggery Side Effects: आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने आज आपल्या देशात...

Share

7 Seater Car :  भारतीय ऑटो बाजारात आज ग्राहक मोठ्या प्रमाणात बजेट सेगमेंटमध्ये जास्त मायलेज देणाऱ्या कार्सची खरेदी मोठ्या प्रमाणात करत आहे. तुम्ही देखील तुमच्या मोठ्या  कुटुंबासाठी नवीन 7 सीटर कार खरेदीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध असणाऱ्या एका जबरदस्त 7 सीटर कारबद्दल माहिती देणार आहोत जे तुम्हाला कमी किमतीमध्ये जास्त मायलेज देणार आहोत.

- Advertisement -

आम्ही येथे तुम्हाला  मारुती Eeco बद्दल बोलत आहोत. सध्या भारतीय बाजारात सर्वात जास्त खरेदी केली जाणाऱ्या 7 सीटर कार्सपैकी मारुती Eeco एक आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, नवीन Eeco ची एक्स-शो रूम किंमत 5.10 लाख रुपयांवरून 8.13 लाख रुपये आहे. म्हणजेच या कमी बजेटच्या वाहनात 7 जण सहज बसू शकतात. चला तर जाणून घ्या या मारुती Eeco बद्दल संपूर्ण माहिती.

- Advertisement -सरकारी योजना, पैसा आणि शेती व आरोग्य विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Maruti Eeco व्यतिरिक्त तुम्ही Renault Triber चा देखील विचार करू शकता. Triber ची एक्स-शो रूम किंमत 5.92 लाख ते 8.51 लाख रुपये आहे.या कारमध्ये कंपनीने दोन पेट्रोल इंजिनचा पर्याय दिला आहे. त्याच्या एका व्हेरियंटमध्ये 1 लिटर क्षमतेचे नॅचरल एस्पिरेटेड इंजिन आहे, जे 72PS पॉवर आणि 96Nm टॉर्क जनरेट करते.

तर दुसऱ्या व्हेरियंटमध्ये 1-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे अधिक शक्तिशाली आहे. हे इंजिन 100PS पॉवर आणि 160Nm टॉर्क जनरेट करते. ही दोन्ही इंजिने 5-स्पीड मॅन्युअल आणि CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जुळलेली आहेत.

या कारची सर्वात खास गोष्ट म्हणजे याला 3th रोमध्ये डिटेचेबल सीट्स देण्यात आल्या आहेत, ज्या काढून टाकल्यानंतर कारच्या मागील भागाला 625 लीटर सामानाची मोठी जागा मिळते. या जागेत तुम्हाला आवश्यक असलेली जवळपास सर्व काही तुम्ही ठेवू शकता.

फीचर्सनुसार, या कारमध्ये 8-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे, जी ऍपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटोशी कनेक्ट केली जाऊ शकते. ही कार अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), स्पीड अलर्ट, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, रियर पार्किंग सेन्सर, स्पीड अलर्ट सिस्टम विथ इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD) सारख्या तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.

सुरक्षा फीचर्स

सुरक्षिततेसाठी, या कारमध्ये ड्युअल एअरबॅग्ज, EBD सह ABS, स्लाइडिंग दरवाजे, इमोबिलायझर, इल्युमिनेटेड हॅझर्ड स्विच, चाइल्ड लॉक आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर यांसारखी फीचर्स आहेत. या कारमध्ये तुम्हाला खूप चांगली जागा मिळेल, भारतात या कारला बर्याच काळापासून पसंत केले जात आहे आणि आतापर्यंत या कारबाबत कोणतीही विशेष तक्रार आढळलेली नाही. यात डिजिटल स्पीडोमीटर आहे.

इंजिन आणि मायलेज

2022 Maruti Eeco ला आता अपडेटेड 1.2L Advanced K-Series Dual Jet, Dual VVT इंजिन मिळते. जे 80.76 PS पॉवर आणि 104.4 Nm टॉर्क जनरेट करते. कंपनीच्या मते, नवीन Eeco पेट्रोल व्हर्जनवर 25% अधिक मायलेज देईल तर Eeco S-CNG ला 29% अधिक मायलेज मिळेल.

Eeco Petrol: 20.20 km/l

Eeco CNG: 27.05 km/kg

हे पण वाचा :- Upcoming Bikes 2023: बजेट तयार ठेवा ; नवीन बाइक्सनी सजणार बाजारपेठ ! मार्केटमध्ये ‘ह्या’ सुपर बाइक्स होणार लाँच