2022 Maruti Suzuki Eeco: मारुती सुझुकीची 7 सीटर कार Eeco ही गेल्या काही वर्षांमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे. कंपनीने लॉन्च झाल्यापासून सुझुकी ईकोच्या 9.75 लाखांहून अधिक युनिट्स विकल्या आहेत.
बहुउद्देशीय असल्याने त्याला बाजारात मोठी मागणी आहे. अलीकडेच मारुती सुझुकीने अधिक पावरफुल इंजिन असलेली 2022 Eeco van (2022 Eeco van) लॉन्च केली आहे. त्याचे इंटीरियरही बदलण्यात आले आहे. लेटेस्ट आणि पावरफुल इंजिनने सुसज्ज असलेल्या नवीन 2022 मारुती सुझुकी इको व्हॅनबद्दलच्या 5 गोष्टी जाणून घ्या.
सरकारी योजना, गुंतवणूक, लाईफस्टाईल टिप्स आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्या वाचा मोफत इथे क्लिक करून
26.78kmpl मायलेज
मारुती सुझुकी Eeco चा सर्वात मोठा USP म्हणजे त्याचे मायलेज. इको व्हॅन आपल्या मायलेज कार्यक्षमतेने देशात काही हॅचबॅक लावू शकते. 2022 मारुती सुझुकी इको व्हॅनची CNG व्हर्जन 26.78 किमी/किलो मायलेज देते, तर इको व्हॅनची पेट्रोल- व्हर्जन 19.71 किमी/लि. मायलेज देते.
फीचर्स आणि सुरक्षितता
अपडेटेड मारुती सुझुकी इको व्हॅन आता नवीन डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, नवीन स्टीयरिंग व्हील, नवीन रिक्लाइनिंग फ्रंट सीट्स आणि आवश्यक एअर प्युरिफायर यांसारख्या फीचर्ससह सुसज्ज आहे.
सुरक्षा फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, नवीन Eeco व्हॅनमध्ये आता 11 हून अधिक नवीन सुरक्षा फीचर्स आहेत, ज्यात ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS, चाइल्ड लॉक, रिअर पार्किंग सेन्सर्स, इल्युमिनेटेड हॅझर्ड स्विच इ.
5 रंग पर्यायांमध्ये उपलब्ध
नवीन 2022 मारुती सुझुकी Eeco व्हॅन आता 5 रंग पर्यायांमध्ये ऑफर करण्यात आली आहे. हे आता मेटॅलिक ब्रिस्क ब्लू, सॉलिड व्हाइट, पर्ल मिडनाईट ब्लॅक, मेटॅलिक सिल्की सिल्व्हर आणि मेटॅलिक ग्लिस्टेनिंग ग्रे रंगात उपलब्ध आहे. या रंग पर्यायांमध्ये मेटॅलिक ब्रिस्क ब्लू नवीनतम ऑफर आहे. मारुती सुझुकी Eeco बाबत कंपनीला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता अपडेटसह येणारी मारुती सुझुकी ईको कंपनीला त्याची विक्री वाढवण्यास मदत करू शकते.
किंमत आणि व्हेरियंट
मागील व्हेरियंट प्रमाणे, नवीन मारुती सुझुकी Eeco देखील अनेक व्हेरियंटमध्ये येते. यामध्ये 5 सीटर स्टँडर्ड, 5 सीटर एसी, 7 सीटर स्टँडर्ड, 7 सीटर एसी, अॅम्ब्युलन्स आणि अॅम्ब्युलन्स शेलचा समावेश आहे.
नवीन 2022 मारुती सुझुकी Eeco व्हॅन देखील व्यावसायिक वाहन म्हणून विकली जाते, जसे की टूर आणि कार्गो. किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, मारुती सुझुकी इकोच्या 5 सीटर स्टँडर्ड व्हेरिएंटची किंमत 5.13 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे, तर मारुती सुझुकी ईकोच्या सीएनजी व्हेरिएंटची किंमत 6.44 लाख रुपये (एक्स-शोरूम,) आहे.
पूर्वीपेक्षा अधिक पावरफुल इंजिन
2022 मारुती सुझुकी इको व्हॅन आता अधिक पावरफुल 1.2-लिटर, K12C, ड्युअल जेट, ड्युअल VVT, नॅचरली-एस्पिरेटेड इंजिनसह सुसज्ज आहे. मारुती सुझुकी इको व्हॅनचे हे नवीन इंजिन 80bhp ची कमाल पॉवर आणि 104.4Nm पीक टॉर्क निर्माण करते.
दुसरीकडे, Maruti Suzuki Eeco चे CNG व्हेरियंट अजूनही समान 71bhp कमाल पॉवर आणि 95Nm कमाल टॉर्क निर्माण करते. याव्यतिरिक्त, दोन्ही इंजिन पर्याय मानक 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जुळतात.