Gram Suraksha Yojana: अरे वाह! फक्त 50 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा 35 लाखांहून अधिक परतावा ; कसे ते जाणून घ्या

Gram Suraksha Yojana:  तुमच्या भविष्याचा विचार करून आज पोस्ट ऑफिस अनेक योजना राबवत आहे. ज्याच्या फायदा घेऊन आज देशातील लाखो नागरिकांनी भविष्याच्या आर्थिक अडचणींचा सामना करण्यासाठी लाखो रुपये जमा केले आहे.

यातच तुम्ही देखील पोस्ट ऑफिसमध्ये तुमची गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला आज एका भन्नाट योजनेबद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या तुम्हाला मोठा फायदा देखील होणार आहे. तुम्ही या योजनेमध्ये गुंतवणूक करून 35 लाखांहून अधिक परतावा प्राप्त करू शकतात.

आम्ही आज तुम्हाला ग्राम सुरक्षा योजनेबद्दल माहिती देणार आहोत. या योजनेमध्ये तुम्ही दररोज 50 रुपयांची बचत करून 35 लाखांपर्यंत मिळवू शकता.

ग्राम सुरक्षा योजनेत कोण गुंतवणूक करू शकते

19 वर्षे ते 55 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती ग्राम सुरक्षा योजना योजनेत गुंतवणूक करू शकते. या पोस्ट ऑफिस योजनेत किमान विमा रक्कम 10,000 रुपये आणि कमाल 10 लाख रुपये आहे. या योजनेअंतर्गत प्रीमियम भरण्यासाठी अनेक पर्याय दिले आहेत. गुंतवणूकदार मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर प्रीमियम भरू शकतात.

किती रक्कम मिळेल

ग्राम सुरक्षा योजनेबाबत दिलेल्या माहितीनुसार जर एखाद्या पात्र व्यक्तीने या योजनेत दरमहा 1,500 रुपये म्हणजेच दररोज केवळ 50 रुपये गुंतवले तर त्याला योजनेच्या मुदतपूर्तीवर 35 लाख रुपयांपर्यंतचा परतावा मिळू शकतो. योजनेअंतर्गत तुम्ही वयाच्या 19 व्या वर्षी 10 लाख रुपयांची ग्राम सुरक्षा योजना खरेदी केल्यास तुम्हाला 55 वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 1,515 रुपये, 58 वर्षांसाठी 1,463 रुपये आणि 60 वर्षांसाठी 1,411 रुपये प्रीमियम भरावा लागेल.

तुम्हाला पूर्ण रक्कम कधी मिळेल

गुंतवणूकदाराला 55 वर्षांच्या मॅच्युरिटीवर 31,60,000 रुपये, 58 वर्षांत 33,40,000 रुपये आणि 60 वर्षांत 34.60 लाख रुपये मिळतील.

ग्राम सुरक्षा योजनेंतर्गत ही रक्कम व्यक्ती 80 वर्षांची झाल्यावर त्याच्याकडे सुपूर्द केली जाते. दुसरीकडे जर व्यक्ती मरण पावली असेल तर ही रक्कम त्या व्यक्तीच्या कायदेशीर वारसाकडे जाते.

हे पण वाचा :  LIC Policy:  भारीच .. ‘या’ पॉलिसीमध्ये तुम्हाला फक्त 60 रुपयांमध्ये मिळते हजारो रुपयांचे संरक्षण ; जाणून घ्या कशी गुंतवणूक करावी