सरकार नागरिकाना लाभ मिळावा यासाठी अनेक योजना आणत असते. या योजनाद्वारे सरकार सामान्य नागरीकांना विविध सुविधांचा लाभ देण्याचा प्रयत्न करते. या योजनांचा भरपूर प्रसार देखील झाला आहे.
याचाच एक भाग म्हणून एका योजनेअंतर्गत केंद्र सरकार सर्वसामान्यांच्या खात्यावर 500 रुपये पाठवते. मात्र या योजनेचा फायदा काही लोकांनाच होतो.म्हणजे सर्वच लोक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.आम्ही तुम्हाला या सरकारी योजनेबद्दल सविस्तरपणे सांगतो
सरकारी योजना, गुंतवणूक, लाईफस्टाईल टिप्स आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्या वाचा मोफत इथे क्लिक करून
जाणून घ्या काय आहे ही योजना या सरकारी योजनेचे नाव अपंग योजना आहे. या पेन्शन योजनेत राज्यानुसार वेगवेगळ्या रकमा गरजूंना हस्तांतरित केल्या जातात. या पेन्शन योजनेचा किमान दर 400 रुपये आणि कमाल दर 500 रुपये आहे.
अपंग निवृत्ती वेतनाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पाठवली जाते. या योजनेद्वारे सरकार देशातील दिव्यांगांना आर्थिक मदत करते.
काय आहे या योजनेचे वैशिष्ट्य- केंद्र सरकार दरमहा ₹ 200 प्रति व्यक्ती योगदान देते आणि उर्वरित रक्कम राज्य सरकार देते.
अर्जदाराने जिथून अर्ज केला आहे त्या राज्याचा कायमचा रहिवासी असावा.
अर्जदाराचे किमान वय 18 वर्षे असावे. उमेदवाराचे कमाल वय 59 वर्षे असावे.
अर्जदाराचे किमान 40% अपंगत्व असावे.
जर अर्जदार इतर कोणत्याही पेन्शन योजनेचा लाभ घेत असेल तर तो या योजनेचा लाभ घेण्यास पात्र नाही.
अर्जदार दारिद्र्यरेषेखालील असावा.