Central Government : केंद्र सरकार अनेकांना आर्थिक फायदा देण्यासाठी आज अनेक योजना राबवत आहे. यापैकी एक योजना म्हणजे ई श्रम योजना.
सरकारने ही योजना 2020 मध्ये सुरू केली होती.असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरु केली आहे. या योजनेत तुम्हाला 2 लाखांच्या विम्याचा लाभ मिळतो.
तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि आतापर्यंत देशातील सुमारे 28.42 कोटी लोक ई-लेबर कार्ड बनवून लाभ घेत आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या या योजनेत असंघटित क्षेत्रात काम करणार्या प्रत्येक नागरिकांना या योजनेत नोंदणी करता येणार आहे .
योजनेचा लाभ घेण्यासाठी eshram.gov.in या ई-श्रम पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन नोंदणी करणे महत्त्वाचे आहे. दुकानदार/विक्रेते/हेल्पर, ऑटो चालक, चालक, पंक्चर बनवणारे, गोरक्षक, दुग्धव्यवसाय करणारे, सर्व पशुपालक, पेपर फेरीवाले, झोमॅटो आणि स्विगी, अॅमेझॉन, फ्लिपकार्ट डिलिव्हरी बॉईज, वीटभट्टी कामगार मजूर इत्यादी श्रेणीतील असंघटित क्षेत्रातील कामगार या योजनेत समाविष्ट केले आहे.
ई-लेबर कार्डचा फायदा काय
ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या कामगारांना 2 लाख रुपयांच्या अपघात विमा संरक्षणाचा लाभ मिळू शकतो. कामगाराचा अपघातामध्ये मृत्यू झाला किंवा त्याला अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार.
या योजनांचे फायदे
ई-कामगार कार्डधारकांना प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना, राष्ट्रीय पेन्शन योजना , अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना , प्रधान मंत्री बिमा योजना , प्रधानमंत्री आवास योजना , राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजना , आयुष्मान भारत , प्रधानमंत्री कौशल विकास योजना , प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजनांचा लाभ होणार आहे.
हे पण वाचा : Alert Malware App: चुकूनही ‘हे’ धोकादायक अॅप डाउनलोड करू नका नाहीतर होऊ शकते बँक खाते रिकामे