Suger Export : साखरेच्या निर्यातीबाबत सरकारचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांचा फायदा की तोटा ?

Suger Export : साधारणपणे केंद्र सरकार साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्णय घेत असते. दरम्यान आता अशातच केंद्र सरकारने साखरेच्या निर्यतीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने थेट साखरेच्या निर्यातीवरील बंदी आणखी एक वर्षासाठी वाढवली आहे. या वर्षी मे महिन्यात साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती, जी 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत लागू होती. शुक्रवारी एका परिपत्रकात ही मर्यादा 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजेच जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक देश बनलेला भारत काही अपवाद वगळता पुढील वर्षभरात साखरेची निर्यात करणार नाही. परिपत्रकानुसार, हा आदेश 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत किंवा पुढील आदेश यापैकी जे आधी येईल तोपर्यंत लागू राहील.

कच्ची साखर, शुद्ध साखर आणि पांढरी साखर यावर निर्यातीचे हे निर्बंध लादण्यात आले आहेत. ही बंदी पहिल्यांदा 24 मे 2022 रोजी लागू करण्यात आली.

साखर निर्यात परिपत्रक

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जारी केलेल्या या परिपत्रकात असे सांगण्यात आले आहे की सीएक्सएल आणि टीआरक्यू (टेरिफ रेट कोटा) कोटा अंतर्गत युरोपियन युनियन आणि यूएसला पाठवल्या जाणाऱ्या साखरेवर हे निर्बंध लागू होणार नाहीत. त्याच महिन्यात, सरकारने म्हटले होते की भारतीय निर्यातदार 31 डिसेंबरपर्यंत टीआरक्यू अंतर्गत अमेरिकेला साखर निर्यात करण्यास सक्षम असतील. निर्यातदारांना आता या वर्षी डिसेंबर अखेरपर्यंत कच्ची साखर निश्चित प्रमाणात अमेरिकेत निर्यात करता येणार आहे.

सप्टेंबरमध्ये संपलेल्या 2021-22 मार्केटिंग वर्षात भारताची साखर निर्यात 57 टक्क्यांनी वाढून 109.8 लाख टन झाली आहे. साखर विपणन वर्ष ऑक्टोबर ते सप्टेंबर पर्यंत चालते.