Post Office Schemes: आजच उघडा पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत तुमच्या मुलाचे खाते ! आयुष्यात भासणार नाही पैशांची कमतरता
Post Office Schemes: ग्राहकांसाठी आज पोस्ट ऑफिस अनेक योजना रावबत आहे. ज्याच्या आतापर्यंत अनेकांनी फायदा घेतला आहे. आज देखील लाखोजण फायदा घेत आहे.
तुम्ही देखील भविष्यासाठी आर्थिक बचत करण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ही खास बातमी तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला आज अशाच एका प्लॅनबद्दल सांगणार आहोत ज्याचा बाजारातील चढ-उताराचा परिणाम होत नाही आणि तुमचे पैसे नेहमी सुरक्षित राहतात.
सरकारी योजना, गुंतवणूक, लाईफस्टाईल टिप्स आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्या वाचा मोफत इथे क्लिक करून
ही पोस्ट ऑफिसची एमआयएस योजना आहे. योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या मुलाचे खाते उघडू शकता जर तुम्ही तुमच्या मुलाच्या नावाने हे खाते उघडले तर तुम्ही तुमच्या मुलाची फी आणि इतर खर्च सहजपणे करू शकता. यामुळे तुमच्या मुलाचे भविष्य देखील उज्ज्वल होईल. चला जाणून घेऊया पोस्ट ऑफिसची एमआयएस योजनेबद्दल संपूर्ण माहिती.
POMIS योजनेमध्ये तुम्ही फक्त 1,000 रुपयांमध्ये खाते उघडू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही संयुक्त खाते देखील उघडू शकता. एका खात्यात 4.5 लाख रुपये आणि संयुक्त खात्यात 9 लाख रुपये गुंतवून तुम्हाला त्याचे फायदे मिळू लागतात. या खात्यात तुम्हाला दरमहा व्याज दिले जाते. या योजनेत गुंतवणूक करून कोणतीही भारतीय व्यक्ती याचा लाभ घेऊ शकते. या योजनेची मुदत पाच वर्षांत आहे.
पैसे कसे काढायचे
तुम्ही 1 वर्ष ते 3 वर्षांच्या दरम्यान पैसे काढल्यास ठेव रकमेतून 2 टक्के वजा करून तुमचे पैसे परत केले जातात. तुम्ही 3 वर्षापूर्वी केव्हाही पैसे काढल्यास तुमच्या ठेव रकमेच्या 1 टक्के वजा केल्यावर तुमचे पैसे परत केले जातात.
2 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक
जर तुम्ही तुमच्या मुलाच्या नावाने हे खाते उघडले असेल आणि तुम्ही त्याच्या नावावर 2 लाख रुपये गुंतवले असतील तर तुम्हाला 6.6% व्याज दराने दरमहा 1100 रुपये मिळतील आणि हे व्याज पाच वर्षांच्या कालावधीनंतर मिळेल. एकूण 66 हजार रुपये होतील. ज्याचा तुम्हाला खूप फायदा होईल.
जर तुम्हाला या योजनेत सामील व्हायचे असेल तर तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि योजनेची संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच गुंतवणूक सुरू करा.
हे पण वाचा : Weather Forecast: अर्रर्र .. हवामान पुन्हा बिघडेल ! ‘या’ भागांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस